फक्त एका ऑडिशनने “या” प्रसिद्ध अभिनेत्रीचे पालटले संपूर्ण नशीब, अन्यथा आज करत असती हे काम…

आजच्या बॉलिवूड सिने सृष्टीतील एक गुणी, सुंदर आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणून अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. तापसीने साऊथच्या चित्रपटांत काम करतानाच बॉलीवूड मधेही चांगलेच नाव कमावले आहे. आताच्या सिनेसृष्टीत तापसी तिच्या बिनधास्त, मदमस्त आणि मोहक स्टाईलसाठीच नव्हे तर उत्कृष्ट अभिनयासाठीही तितकीच प्रसिद्ध आहे.

१ ऑगस्ट १९८७ हा तिचा जन्मदिवस. जन्माने शीख धर्मीय असणाऱ्या तापसीने वडील दिलमोहन सिंग हे राजधानी दिल्लीमधील एक व्यावसायिक आहेतआणि तापसीची आई निर्मलजीत पन्नू या सुखवस्तू गृहिणी आहेत.

तापसीला बॉलिवूडच्या या अफाट सिनेसृष्टीत कोणीही गॉडफादर अथवा मार्गदर्शक नव्हते… नाही. अनेक स्ट्रगलर नवोदितांप्रमाणे तापसी सुद्धा या सिनेसृष्टीत एक आऊटसायडरच समजली जाते. आज तापसीची स्वतःची अशी जी काही ओळख आहे ती केवळ तिने तिच्या स्वत:च्या मेहनतीने तापसीने साध्य केलेली आहे. तापसीला बालपणापासूनच नृत्यकलेची आवड असल्यामुळे तिने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षापासून शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

अगदी बालवयात तिने कथक आणि भरतनाट्यम हर नृत्यप्रकार शिकण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षण राजधानी दिल्लीच्या माता जय कौर पब्लिक स्कूलमधून तापसीने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्पुटर सायन्स मधील इंजिनिअरिंग ची पदवी घेतली. कॉम्पुटर इंजिनिअर झाल्यानंतर, इतर सर्वसामान्य मुलाप्रमाणे तिलाही सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून काम मिळाले. तिची नोकरी सुरू झाली. पण…

तापसीच्या नशीबात मात्र बॉलीवूड मधील बिग स्क्रीन वरील हिरोईन होण्याचाच योग लिहिलेला होता. तर त्याचे नेमके झाले असे की, “चॅनेल व्ही” या सुप्रसिद्ध म्युझिक चॅनलच्या टॅलेंट शो “गेट गॉर्जियस” साठीच्या ऑडिशन्स सुरू होत्या. त्यासाठी तापसीनेही तयारी केली, ऑडिशन दिली आणि चक्क तीची निवडही झाली. आणि यानंतर मात्र तापसीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

मॉडेलिंग हाच आपल्या पुढील करियरचा मार्ग ठरवला. नंतर तापसीने कठोर मेहनतीने नवीन गोष्टी शिकत, नवी आव्हाने स्वीकारत तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीत प्रगती केली. दरम्यानच्या काळात तापसीने, पैंटालून, मोटोरोला, डाबर, एयरटेल, कोका कोला अशा कित्येक नावाजलेल्या टॉपच्या ब्रँडच्या जाहिराती केल्या.

आता तापसीचे मॉडेलिंग विश्वात करियर चांगले सेट झाले होते. ती नाव, पैसा, यश, कमावत होती. सातत्याने जाहिरातींमध्ये ती लोकांसमोर येत होती. अशा या आकर्षक चेहऱ्याच्या टॅलेंटकडे चित्रपट सृष्टीतील पारख्यांचे लक्ष न गेले तर नवलच. अचानक तिला साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडून चांगल्या सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. २०१० मध्ये तिने झुमांडी नादम हा तेलगू चित्रपट स्वीकारला.

त्यात चांगला अभिनयही केला. त्यानंतर मग तीने साऊथ च्या सुमारे दहाबारा चित्रपटांत काम केले. बॉलीवूड सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी तापसीला सन २०१३ पर्यंत वाट पाहावी लागली. अखेर “चश्मेबद्दूर” या चित्रपटाद्वारे तापसीचा बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला. तापसीच्या या पहिल्या फिल्मची बॉक्स ऑफिस कमाई सरासरीच होती परंतु तापसी मात्र जाणकार सिनेरसिकांच्या नजरेत आली.

तापसीच्या बॉलीवूड करियर मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक शुजित सरकारचा ‘पिंक’ हा चित्रपट एक मैलाचा द’ग’ड ठरला. या चित्रपटातील तापसीच्या लक्षवेधक अभिनयाने प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या मनांत मानाचे स्थान मिळविले. या भूमिकेने तापसीने रसिकांची मने जिंकून टाळ्या, वाहवा मिळविली. याच पिंक फिल्मनंतर तापसीकडे चित्रपटांची रीघ लागली.

पिंक नंतर तिने, ‘बेबी’, ‘नाम शबाना’, ‘सूरमा’, ‘द गाजी अ’टै’क’, ‘मनमर्जियां’, ‘बदला’, ‘मुल्क’, ‘सां’ड की आंख’ आणि ‘थप्पड़’  यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी तापसीचे या भूमिकांसाठी केवळ सिनेरसिकच नव्हे तर सिनेसमीक्षकांकडूनही कौतुक झालं. तापसीच्या रूपाने बॉलीवूडला एक नवीन प्रतिभावान अभिनेत्री मिळाली, असेच म्हणावे लागेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment