टीम इंडियाचे विश्वचषक २०२३ पर्यंतचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, पहा भारतीय खेळाडू कोणत्या संघाविरुद्ध कधी मैदानात उतरतील..!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

भारतीय संघाने २०२२ च्या T-२० विश्वचषक स्पर्धेत ग्रुप-२ मध्ये अव्वल स्थान मिळवून चमकदार कामगिरी केली होती. पण टीम इंडिया आपल्या महत्त्वाच्या सामन्यात काही विशेष करू शकली नाही आणि इंग्लंडकडून १० विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. यानंतर चाहते भारतीय खेळाडूंना जोरदार ट्रोल करत आहेत. आता भारताचे संपूर्ण लक्ष २०२३ च्या वनडे विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील मिशनकडे आहे. अशा परिस्थितीत या लेखाद्वारे २०२२ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारताच्या संपूर्ण वेळापत्रकाबद्दल जाणून घेऊया.

खरं तर, टी-२० विश्वचषक २०२२ मधील उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. चाहते टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला टार्गेट करत ट्रोल करत असताना आता भारत आपल्या पुढच्या मिशनकडे वाटचाल करत आहे.आईसीसीने २०२३ च्या विश्वचषकापर्यंत भारताचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषका पर्यंत टीम इंडियाच्या प्रत्येक दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे.

See also  भारताच्या गानकोकिळा यांचा जीवनप्रवास थांबला, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१७ नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे आणि टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेनंतर भारताला न्यूझीलंड सोबत एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे, जी २५ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले आहे.

१) नोव्हेंबर २०२२ – न्यूझीलंड विरुद्ध – ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ३ टी-२० मालिका.

2) डिसेंबर २०२२- बांगलादेश विरुद्ध – ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ३ टी-२० मालिका.

३) जानेवारी-फेब्रुवारी २०२३- न्यूझीलंड विरुद्ध – ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ३ टी-२० मालिका.

४) फेब्रुवारी-मार्च २०२३- ऑस्ट्रेलियाविरुद्ध- ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ४ कसोटी.

See also  शाहरुख खानची मूलगी सुहाना होणार ह्या आलिशान कुटुंबाची सून, जाणून घ्या कोण असेल तिचा होणारा पती?

५) मार्च-मे २०२३- आयपीएल- ७४ सामने.

६) सप्टेंबर २०२३- आशिया कप.

७) सप्टेंबर २०२३- ऑस्ट्रेलिया विरुद्ध – ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका.

८) ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३- एकदिवसीय विश्वचषक २०२३.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment