“हक्काच्या प्रेमाचं माणूस…” अगबाई सासूबाई मधील शुभ्राची पोस्ट सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल…
सध्या मराठी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची सर्वत्र खूप चर्चा चालू आहे. तिचा सध्याचा बदललेला नवा लुक चाहत्यांना भुरळ घालत आहे. कारण त्यामध्ये तिने स्वतःच्या फिटनेस ला एवढं स्लिम केलं आहे की चाहते ओळखायला सुद्धा कमी पडत आहेत. ती अभिनेत्री सोशल मिडीयावर फार कार्यरत असते.
तिचे लाखो चाहते आहेत. त्याशिवाय ती घराघरात पोहचलेली आहे. तर स्त आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं कुणाबद्दल बोललं जात आहे. तर होणार सून मी मधून पदार्पण करून व अगबाई सासूबाई मधून यशाच्या शिखरापर्यंत पोहचणारी प्रसिद्ध तरून अभिनेत्री तेजश्री प्रधान बद्दल.
तेजश्री प्रधान ही एक खूप उत्तम अशी मराठी अभिनेत्री आहे. तिने आत्तपर्यंत अनेक मालिकांत कामे केलेले आहेत. तिचा आत्तपर्यंत च्या सर्वच भूमिका या खूप गाजलेल्या आहेत. होणार सून मी या घरची मधील जानव्ही तर घराघरात जाऊन अक्षरशः सर्वाना वेद लावले होते. त्यानंतर मध्ये अगबाई सासूबाई म्हणून प्रचंड गाजलेली झी मराठी वाहिनीवर मालिका आली होती. ज्यात शुभ्रा म्हणून ती पुन्हा लोकांना आवडली. चर्चेत आली.
पण त्याच मालिकेचा सिक्वेल म्हणून कोरोना काळात झी मराठीने अगबाई सुनबाई सुरु केली; पण त्या मालिकेत तिने काम करण्यास नकार दिला. आता त्याचं खरं कारण काय आहे हे अजूनही स्पष्ट होत नाही. तेव्हाही ती खूप चर्चेत होती.
अगबाई सासूबाई नंतर मालिका मधून तेजश्री जे गायब झाली ते सोशल मिडिया वरच कधी तरी दिसली. त्यावेळी तिचे काही हिंदी इंडस्ट्रीत केलेले कामे आले होते. पण त्यानंतर सोशल मीडिया वर टाकलेले खूप बदललेले फोटो वाऱ्या सारखे व्हायरल झाले.
अश्यात सध्याचा एक फोटो आणि त्याचं टाकलेलं कॅप्शन सध्या खूप व्हायरल होत आहे. तिने त्यामध्ये असे लिहिले आहे की कुणीतरी हक्काचं आपल्या आयुष्यात येतं आणि सगळं आयुष्यच बदलून जातं. आता याकडे प्रेमाचे संकेत म्हणून अनेकांनी पाहिलं. कारण तेजश्री प्रधान चा शशांक केतकर सोबत लग्न झालं होतं; पण काही कारणासत्व तुटले.
त्यांनी घटस्फो’ट घेतला. तेव्हापासून शुभ्रा प्रेम वगैरे याच्या भानगडीत पडतच नव्हती; पण अगबाई सासूबाई मधील सोहम तिचा खूप जवळचा मित्र झाला. सोहम म्हणजेच आशुतोष पत्की आणि मग सुरु झाला मैत्रीच्या प्रेमाचा पुन्हा नव्याने प्रवास. दोघेही एकेमेकांच्या प्रेमात आहेत. असे चाहत्यांना वाटते. कारण मालिका सुद्धा दोघांनी सोबतच सोडली. सोशल मीडियामध्ये ही त्यांच्या एकमेकांच्या विषयी खूप प्रेमळ पोस्ट असतात.
ते दोघे तरी अजून खुल्या मनाने नात्यावर बोलले नाही; पण पडद्याआडच्या शब्द मार्गाने त्यांची सोशल मिडिया वर सूचित करण्याचा खेळ चालूच आहे. हरकत नाही. जोडी चांगली आहे. आयुष्यात जर एकत्र येऊन सुखाचे दिवस आले तर आनंदच. पुढील वाटचाली साठी दोघांना ही स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.