अभिनेत्री तेजश्री प्रधान करणार आहे फक्त अश्या मुलाशी लग्न, ज्याच्यामध्ये असतील हे गुण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठी या वाहिनीवरील “अग्गंबाई सासूबाई” ह्या मालिकेतील शुभ्रा आणि बबङया यांच्या जोडीने महाराष्ट्रातील सर्व रसिकांना अक्षरशः वे’ड लावले. ही ढिंकचाक जोडी नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली.

म्हणून तर ही मालिका संपून कित्येक महिने झाले, तरीही ही जोडी आजही भरपूर फेमस आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, शुभ्रा आणि बबङया यांच्या जोडीपेक्षा अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की या जोङीची रियल लाइफ मध्ये खूप चर्चा होत आहे.

tejashree pradhan 10

तर अलीकडेच तेजश्रीच्या वाढदिवसाच्या दिवशी आशुतोषने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेयर केला होता. हा फोटो एवढ्या मोठ्या प्रमाणात वायरल झाला की, त्यांच्या चाहत्यांनी या दोन कलाकारांमध्ये अफेयर असल्याची चर्चा सुरू केली.

See also  लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण घरात राहून नेमकी झाली तरी कशी बरं, ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

त्याचप्रमाणे आशुतोष पत्की याने तेजश्रीला आपला संपूर्ण भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे तर या चर्चेला उधाण आले आहे. परंतु तेजश्रीने मात्र आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्री असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “आशुतोष हा माझा खूप जवळचा मित्र आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त त्याने फोटो शेयर केला होता.

marathi industry will get justice if talent is given importance tejashree pradhan 201907271764

मालिका सुरू होण्याआधीपासूनच आशुतोष व माझ्यामध्ये कोणते नाते तर नाही ना, अशा चर्चा होत होत्या. परंतु हे सर्व माझ्यासाठी काही नवीन नाही.पण आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे नाते आहे. यापलीकडे दुसरे काहीच नाही.

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचं दिसणं, बोलणं, वागणं हे सर्वांनाच आवडते. त्यामुळे चाहत्यांना तिच्या लग्नाची फार उत्सुकता लागून आहे. यावर तेजश्री म्हणाली की,”मला खरंच लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायला आवडेल. त्यामुळे मला कुणी मुलगा मनापासून आवडला तर मी जास्त वाट न पाहता पुढील सहा महिन्यांत ताबडतोब लग्न करून घेईल.”

See also  'या' इवल्याशा गोंडस परीला ओळखलंत का? आज आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री...

a scene from agga bai sasubai 1

तेजश्रीला जोडीदार कसा हवा, हा प्रश्न विचारला असता, ती म्हणाली की,”मला समजूतदार आणि जबाबदार असा जोडीदार हवा आहे. मग तो अभिनय क्षेत्रातील असला तरीही चालेल.

मात्र मला लग्नासाठी प्रपोज त्यानेच करावे, अशी माझी इच्छा आहे.” दुसऱ्या मालिकेत तेजश्रीला काम करायला आवडेल, परंतु सध्याची परिस्थिती पाहून काही काळ तिने थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

Tejashree Pradhan

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment