बबड्यासाठी शुभ्राने केलेली खास पोस्ट वाचून थक्क व्हाल, म्हणाली,”कधी तू माझा…”

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत बबड्या अर्थात सोहमची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की अल्पावधीतच प्रकाश झोतात आला.

आणि आता खूप लोकप्रिय झालेला आहे. त्याच्या नावाचे memes आणि इतर बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकंदरीत बबड्या घराघरात गेलेला आहे.

तो साकारत असलेली बबड्याची भूमिका जरी नकारात्मक असली तरी त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळतेय. आशुतोषचा २२ डिसेंबर रोजी नुकताच त्याचा वाढदिवस झाला असून मालिकेत त्याच्या पत्नीची अर्थात शुभ्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. आणि ती पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

तिने पोस्ट मध्ये लिहिलं की आपण भांडतो, पुन्हा एकमेकांशी बोलतो, कॉफीच्या ब्रेकदरम्यान एकमेकांचे सिक्रेट्स शेअर करतो. कधी तू माझा मित्र असतोस तर कधी माझा मार्गदर्शक असतोस’, असं लिहित तेजश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हुशार, विनोदी आणि सर्वांत सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. थांब मी व्यक्तीला म्हणाले का? व्यक्तीकडून असं मला म्हणायचं होतं,’ असं लिहित तेजश्रीने आशुतोषची गंमत केली. आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या आशुतोषला अभिनयाची फार आवड आहे.

आता त्यांचं काहीतरी आहे का ? मन जुळलं का ? अशी चर्चा चालू आहे. पाहुयात नेमकं यांचं कितपत खरं प्रेम किंवा मैत्री आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment