लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानचं हे सगळ्यात मोठं स्वप्न झालं पूर्ण, सोशल मीडियावर फोटो होत आहेत व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मध्ये एक अशी अभिनेत्री आहे जी खूप कमी काळात एका लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचली होती. जिचं नाव आहे तेजश्री प्रधान ( tejshri pradhan ). होय, तेजश्री प्रधान म्हंटल की आपल्याला शशांक केतकर ( shashank ketkar ) आणि तिचं असलेलं नातं घटस्फोट नंतरच. किंवा अगबाई सासूबाई मध्ये का काम करत नाही किंवा नवा होणारा आशिक बबड्या आहे का?

70073062

Advertisement

पण यावेळी काही वेगळ्याच कारणांमुळे आपल्याला तेजश्री दिसणार आहे. म्हणजेच तिच्या आयुष्य घडलेलं एक मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि ते स्वप्न काय ? हे सर्व माहीती सोबत जाणून घेऊ.

See also  'देवमाणूस' मालिकेतील नाम्या माहीत आहे का? खऱ्या आयुष्यात आहे असा, आधी करायचा हे काम...

होणार सून मी या घरची’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. तेजश्रीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अनेक चित्रपट, नाटक व मालिकांमधून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Advertisement

tejashree pradhan in agga bai sasubai episode 99 2019

तेजश्रीने साकारलेल्या भूमिकांचं देखील प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. परंतु, त्यापलीकडे जात तेजश्रीने चित्रपटसृष्टीत आणखी एक पाउल पुढे टाकलं आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी तेजश्री आता निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. नुकतीच तेजश्रीने तिच्या निर्मिती संस्थेची घोषणा केली आहे.

Advertisement

टेक ड्रीम्स प्रोडक्शन’ असं तेजश्रीच्या निर्मिती संस्थेचं नाव असून ही संस्था तेजश्री आणि तिच्या मैत्रिणीने मिळून सुरू केली आहे. तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. पोस्ट शेअर करत तेजश्रीने लिहिलं, ‘माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काहीतरी खास आहे. मी आणि माझी मैत्रीण कीर्ती नेरकर नेहमीच काहीतरी वेगळं करण्याबद्दल बोलायचो, आमच्या आवडीचा कन्टेन्ट तयार करण्याबद्दल आणि असं काहीतरी लिहिण्याबद्दल जे जादुई असेल.

See also  'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेत होतेय या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री, मालिकेत आलाय हैराण करणारा ट्विस्ट...

download

Advertisement

अखेरीस आमच्या रोज रात्रीच्या बोलण्याला, विचारांच्या देवाणघेवाणीला, कल्पनांना आणि स्वप्नांना एक चेहरा मिळालाय. मला आमचं स्वप्न तुमच्यासमोर सादर करायला प्रचंड आनंद होतोय… आमची निर्मिती संस्था ‘टेक ड्रीम्स प्रोडक्शन’.

यासोबत तेजश्रीने चाहत्यांना त्याचं प्रेम आणि आशीर्वाद कायम तिच्यासोबत ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तेजश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. इतर कलाकारांनीही तेजश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यापूर्वी तेजश्री ‘अगंबाई सासूबाई’ मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तेजश्रीचा बॉलिवूड चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

तेजश्री ही एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. आणि तिचा नवीन क्षेत्रात सुरुवात होणं ही खूप आनंदाची बाब आहे. तिला तिच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून शुभेच्छा.

See also  'पाहिले न मी तुला' या मालिकेतील प्रमुख अभिनेता आशय कुलकर्णी या कारणांमुळे झाला होता गायब!
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close