‘तेरे बाप से पूछ कौन हूं मैं’, जेव्हा सुपरस्टार राजकुमारने मोडला होता सलमान खानचा माज…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेता सलमान खान प्रचंड लोकप्रिय आहे, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते जीवाची पराकाष्टा करतात. सोशल मीडियावर लाखो लोक त्याला फॉलो करत असतात.शिवाय आतापर्यंत त्याचे जेवढे देखील चित्रपट शूट केले आहेत ते सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. त्यामुळे एक कलाकार आणि एक अभिनेता या दोन्ही भूमिकेत त्याने भरपूर प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. येत्या प्रत्येक दिनी त्याची काही ना काही बातमी असतेच, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो चर्चेचा विषय बनत असतो. शिवाय देश विदेशात अनेकजण त्याची बायोग्राफी उत्सुकतेने वाचत असतात.

जरी तो आता ५० वर्षाचा झाला असला तरीही त्याचा चाहतावर्ग वाढतच आहे, सलमान खान आपल्या प्रोफेशनल लाईफ मुळे नेहमीच चर्चेत येत असतो, तसेच तो पर्सनल लाईफ मुळे देखील नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या पर्सनल लाईफची कहाणी देखील ऐकण्यासारखी आहे, आपण सर्वजण जाणून आहोतच की सलमान खानचा राग नेहमी सातव्या स्तरावर असतो. जो कोणी त्याच्याशी पंगा घेतो त्याला खूप नुकसान सोसावे लागते. त्यामुळे बॉलिवूड मध्ये चुकूनच कोणीतरी असे असेल जो सलमान खान सोबत भांडण करेल.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ४० वर्षानंतरही आहेत अविवाहित, 4 नंबरची अभिनेत्री तर...

पण मित्रहो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूड मध्ये अशीही एक व्यक्ती होती ज्यांनी सलमानला त्याच्या ताठ वागण्यामुळे खूप सुनावले होते. सलमानच्या करिअरची सुरुवात “१९८८” मध्ये झाली होती. “बिवी हो तो ऐसी” हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये त्याने एका सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत काम केले होते. नंतर “मैने प्यार किया” या चित्रपटात त्याने मुख्य नायक म्हणून भूमिका निभावली. त्याचा तो चित्रपट आजही प्रचंड सक्रिय असून लोकप्रिय देखील आहे. या चित्रपटानंतर सलमान सर्वत्र प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला होता.

या फिल्मला मिळालेले यश साजरे करण्यासाठी एक सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये सूरज बडजात्या यांच्या फॅमिली सोबत सुपरस्टार राजकुमार यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. रातोरात स्टार बनल्यानंतर सलमानला नशा करण्याची वाईट सवय देखील लागली होती. त्या आयोजित केलेल्या सक्सेस पार्टी मध्ये सलमान पिऊन गेला होता, सूरज बडजात्या सलमानला सर्वांशी भेट करवून देत होते. त्यावेळी त्यांनी अभिनेते राजकुमार यांच्याशी सलमानची भेट करवून दिली. त्यावेळी सलमान राजकुमार यांना चांगलेच ओळखत होता.

See also  सानिया मिर्झा पती शोएब मलिकसमोर म्हणाली 'या बॉलीवूड अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न', जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता!

मात्र तरीही त्याने त्यावेळी त्यांना प्रश्न केला “आपण कोण आहे ?” हे ऐकून राजकुमार खूप भडकले आणि त्यानंतर त्यांनी सलमान खानची पूर्ण दारू उतरवलीच. राजकुमार त्यावेळी सलमानला उत्तर देत म्हणाले की ” बरखुरदार ! ही गोष्ट आपल्या पित्याला सलीम खानला जाऊन विचार की मी कोण आहे!” राजकुमार यांनी त्यावेळी उभ्यानेच सलमानला सर्वांसमोर असे बोलले, त्यामुळे क्षणात सलमानची सगळी नशा उतरून तो ध्यानावर आला. अनेकजण तिथे उपस्थित लोक सलमानकडे एकटक पाहत होते. त्यावेळी सलमानला त्याची चूक लक्षात आली.

बॉलिवूड मध्ये राजकुमार यांच्याशी पंगा घेतलेले अनेकजण होते, ते एक उद्धट वागणारे अभिनेते म्हणून देखील त्यांची ओळख होती. अनेकांना त्यांनी खूप सुनावले होते, त्यामुळे लोक त्यांच्याशी जरा जपूनच बोलत असत. मात्र तरीही त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले असून आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे ३ जुलै १९९६ मध्ये निधन झाले होते. जर ते आपल्या सोबत नसले तरीही त्यांचे खूपसे चित्रपट मात्र आज देखील त्यांची आठवण करून देतात आणि ही आठवण नेहमी अशी राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  बॉलिवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री मध्य रात्री गेली होती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी, कारण ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment