“चल बुरखा घाल आणि नमाज अदा कर” असं शाहरुख एकदा गौरीला म्हणाला आणि सर्वांना एकच धक्का बसला…
शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतली एक अशी लव्हस्टोरी जगलेलं जोडपं की ऐकून थक्क व्हाल. कारण दोघांना एकत्र येण्यासाठी फार अथक असे परिश्रम घ्यावे लागले. गौरी हिंदू तर शाहरुख मुस्लिम होता. आता दोन धर्म वेगवेगळे म्हणल्यावर तर 100 टक्के अडचणी येणारच होत्या. गौरी च्या घरच्यांना त दोघांच्या लग्नाला विरोध होता. पण दोघे तर एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते.
मग काय शाहरुख तब्बल 5 वर्षं हिंदू म्हणून गौरी च्या घरच्या समोर राहिला. अश्या अनेक करामती आहेत. तर आज आपण त्यातल्याच काही जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर पाहुयात. ही गोष्ट तेव्हाची आहे. जेव्हा शाहरुख खान हा फक्त 18 वर्षांचा होता. त्यावेळी तर अभिनय वगैरे काही सुरू सुद्धा नव्हतं. तेव्हा त्याने एका मित्राच्या पार्टीत गौरीला पाहिलं आणि मग काय पहिल्या नजरेत त्याला ती आवडली.
गौरी डान्स करत होती. तर शाहरुख ही तिच्या सोबत डान्स करण्याचा प्रयत्न करू लागला. गौरी त्यावेळी खूप लाजत होती. तेव्हा शाहरुख म्हणाला नाच की. तेव्हा ती म्हणाली मी माझ्या बॉयफ्रेंड ची वाट बघत आहे.
पण खर म्हणजे तिचा कुणी बॉयफ्रेंड नव्हता. भाऊ आलेला होता. त्या दिवसा पासून दोघांची मैत्री झाली. मग प्रेम आणि नंतर लग्न. या दरम्यान शाहरुख ने फार स्ट्रगल केला. पुढे शाहरुख मुंबईत आला. लोकप्रिय झाला. पण त्याने आजवर कधी इतर कलाकारांच्या सारखी मध्येच गौरी ची साथ सोडली नाही.
शाहरुख आणि गौरी च्या लग्नाचा एक मोठा अडथळा म्हणजे, काय तर हा तो काळ होता जेव्हा शाहरुख चित्रपटांसाठी संघर्ष करत होता, स्ट्रगल खूप होतं. पण अखेर यशाच्या शिखरावर शाहरुख गेला आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला.
त्यानंतर 26 ऑगस्ट 1991 रोजी दोघांनी लग्न केले. आधी कोर्ट मॅरेज केलं. यादरम्यान गौरीचे नाव ‘आयशा’ ठेवण्यात आले होते. लग्न झाल्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार सुद्धा लग्न केले. अशा प्रकारे दोघांनी तीनदा लग्न केले. तर हे आहे त्यांच्या बाबतीत माहीत नसलेला किस्सा.