“चला हवा येऊ द्या” मधील कलाकाराला या अभिनेत्रीमुळे सहन करावा लागत आहे मनस्ताप, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण…
झी मराठी वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” या सुप्रसिद्ध शो चे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात फॅन्स आहेत. अगदी सुरुवातीपासून प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमावर भरघोस प्रेम करतात. त्यामुळेच तर या शो मधील प्रत्येक कलाकाराला रसिकांनी अक्षरशः ङोक्यावर उचलून धरले आहे. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोक हा कार्यक्रम अतिशय आवडीने व उत्सुकतेने पाहतात. या शो ने फक्त कलाकारांनाच नव्हे तर इतर आर्टिस्टला सुद्धा त्यांची ओळख मिळवून दिली आहे. त्यांपैकी एक कलाकार म्हणजे तुषार देवल.
“चला हवा येऊ द्या” या शो मध्ये तुषार देवल हा संगीत संयोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पडतो. तसेच काही विनोदी स्कीट्समध्ये सुद्धा त्याचा सहभाग असतो. त्यामुळे तुषार या शो मध्ये खूप प्रसिद्ध आहे. परंतु सध्या त्याला एका वेगळ्याच गोष्टीला तोंड द्यावे लागत आहे. त्याला हिंदी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या सोशल मीडियावर याविषयी स्पष्टपणे खुलासा करत त्याने एक पोस्ट शेयर केली आहे.
हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री गुलकी जोशी हिने तिच्या युट्यूब व्हिडीओ मध्ये सिंटाचे कार्ङ दाखवले आहे. तर त्यामध्ये तुषारचा मोबाईल नंबर होता. त्याचे झाले असे की, हा मोबाईल नंबर ब्लर न करता तसाच दाखवण्यात आला. त्यामुळे लोक आता तुषार देवल ला कॉल आणि मेसेजेस करून सारखेच पीङत आहेत. दरदिवस त्याला 100 च्या आसपास कॉल येत आहेत. बहुतेकदा त्याने हा नंबर ख्यातीचा नसल्याचे त्यांना सांगितले, मात्र काहीच फायदा झाला नाही.
शेवटी तुषार च्या एका मित्राने हा सर्व प्रकार ख्याती पर्यंत पोहोचवला. त्यानंतर मग ख्याती ने व्हिडीओ मधील त्याचा नंबर ब्लर केला. मात्र हे करण्यात खूप उशीर झाला. कारण तोपर्यंत तुषार देवल चा नंबर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. त्यामुळे ख्याती ने निदान एक सॉरी म्हणण्यासाठी तरी कॉल करावा, असे तुषार चे म्हणणे आहे.
अभिनेत्री गुलकी जोशी ही मालिका विश्वातील एक नामांकित अभिनेत्री आहे. “मॅङम सर” ह्या या मालिकेत मुख्य भूमिकेत ती सध्या झळकत आहे. याआधी तिने “वागळे की दुनिया” “तेरा यार हूं मैं” “जिद्दी दिल माने ना” यांसारख्या हिंदी भूमिका देखील साकारल्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.