“ठिपक्यांची रांगोळी” मालिकेतील हा अभिनेता पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात ! सोशल मीडियावर फोटो व्हायरल…
सध्या मराठी टेलिव्हिजन वर स्टार प्रवाह वर सुरू असलेली ठिपक्यांची रांगोळी ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतील खरी उतरत आहेत. कारण त्यामध्ये असणारं कथानक आणि काम करणारी टीम यामुळेच मालिका टीआरपी मध्ये सुद्धा आघाडीवर आहे. नाव सुद्धा मालिकेचं खुप वेगळं आहे. या मालिकेत काम करणाऱ्या प्रमुख कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. तर आज आपण प्रमुख स्त्री पुरुष जोडीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेते अभिनेत्री यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. की नेमकं कुणाचं आयुष्य काय म्हणतय.
व कोण कुणाच्या प्रेमात आहे. कारण काय होतं एकत्र थोडं जरी काम केलं तरी मैत्री होते आणि कुठेतरी ही मैत्री एका प्रेमाच्या बंधनात अडकत जाते. त्यामुळे आपण ही तेच जाणून घेणार आहोत. या मालिकेत प्रसिद्ध तरुण अभिनेता चेतन वडनेरे हा प्रमुख शशांक चं पात्र साकारत आहे. तो सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
त्यामुळे अल्पावधीतच तोही घराघरात जाऊन पोहचला आहे. शशांक हे पात्र उर्मट जरी असलं तरी कुठं तरी मानवी जीवनातलच असल्याने ते चर्चेत येत आहे. हा शशांक आता अपूर्वा सोबत लग्न करणार का ? हे पाहणं उत्सुकता आणणारं ठरणार आहे. सध्या या वळणावर येऊन मालिका ठेपलेली आहे. प्रसिद्ध अभिनेता चेतन ने सोशल मीडियावर ऋतुजा धारप सोबतचा फोटो शेयर करून एका प्रकारे चाहत्यांना संकेत दिलं आहे की आम्ही प्रेमात आहोत ? म्हणजे त्यांच्या फोटोवरून लक्षात येतं की ऋतुजा ला चेतन हा डेट करत आहेत.
कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या दोघांची लेह लडाख ची ट्रिप खूप एन्जॉय केली. ज्याचे सोबतचे अपडेट त्यांनी सोशल मीडियावर दिले होते. यांच्या सोबत अभिनेता गौरव मालवणकर व शर्वरी जोग ही अभिनेत्री सुद्धा दिसले. कारण या दोघांनी तर खुल्या दिलाने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे.
चेतन हा मूळचा नाशिक चा आहे. त्याने नाटक, एकांकिका मध्ये कामे करत इथपर्यंत प्रवास सुखकर केला आहे. त्याला आपण याआधी अनेक मालिकेत सुद्धा पाहिलं असेल. त्याचा सोशल मीडियावर चाहता वर्ग ही बराच आहे. ऋतुजा धारप सुद्धा सध्या खूप असं काम करत आहे.
तिचा ही सोशल मीडियावर चांगलाच चाहता वर्ग आहे. पण अजून या दोघांनी मात्र प्रेमाची कबुली काही दिलेली नाही. काय माहीत कधी देतायत ? बाकी प्रेम असू नसो मैत्रीच्या नात्याला तरी त्यांना खूप शुभेच्छा. आनंदात जीवन जगत राहिलं पाहिजे. बस.