“या” बहादूर अभिनेत्याने तब्बल 37 वेळा एक किसींग सीन रिटेक केला, यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क
“लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन” हे शब्द कानी पडले की शूटिंगची धम्माल सुरू होते. शूटिंग म्हटले की कट शॉट सीन चालूच राहतात. अहो, परंतु एक सीन एखादा अभिनेता कितीवेळा शूट करत असेल बरं…. कमीत कमी पाच ते सात वेळा ठीक आहे. “कांची” या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारत होता. यादरम्यानचा एक किस्सा आज आम्ही तुमच्याशी शेयर करत आहोत.
“प्यार का पंचनामा” या चित्रपटात फक्त पाच मिनिटांच्या मोनोलॉगमुळे सुप्रसिद्ध झालेला अभिनेता कार्तिक आर्यन याला ओळखत नाही, असे कुणी शोधूनही सापडणार नाही. विनोदी अभिनयापासून ते अगदी गंभीर भूमिकांपर्यंत कार्तिक आपलं काम अगदी चोखपणे पार पाडतो. त्यामुळेच आज तो प्रसिद्धीत झळकत आहे.
तुम्हांला ठाऊक आहे का, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच कार्तिक ने पहिला चित्रपट साइन केला. “प्यार का पंचनामा” हा त्याचा पहिलावहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर त्याने “आकाशवाणी” आणि “कांची – द अनब्रेकेबल” या चित्रपटांत सुद्धा काम केले.
नामांकित दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कांची ह्या चित्रपटात कार्तिक आर्यन ने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात त्याला एक किसींग सीन तब्बल 37 वेळा द्यावा लागला होता. यामध्ये त्याच्यासोबत मिष्टी ही मुख्य भूमिकेत होती. परंतु हा सीन करणे, कार्तिक आर्यन साठी मुळीच सोपे नव्हते.
हा किसींग सीन करताना त्याला कित्येक अडचणी येत होत्या. याच कारणामुळे तर जवळपास त्याला हा किसींग सीन 37 वेळा रिटेक करावे लागत होते. आपल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन याने या सीन विषयी सांगितले होते.” सुभाष घई यांना पॅशनेट कीसचा सीन हवा होता. पण त्यावेळी मला किस करायला येतच नव्हते. म्हणून त्याने सरांना सांगितले की, सर प्लीज मला हा सीन काही जमत नाही. तुम्ही करून दाखवता का प्लीज…”असे कार्तिक म्हणाला होता.
त्यानंतर तो पुढे म्हणाला की,”एक किसींग सीन एवढं ङोकं खाऊ शकतो, असे कधीच वाटले नव्हते.” अभिनेता कार्तिक आर्यन याने 2011 मध्ये बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. त्याने आतापर्यंत प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2, आकाशवाणी, सोनू के टिटू की स्वीटी, लुकाछुपी, पती- पत्नी और वो या चित्रपटांत काम केले आहे. त्याचप्रमाणे लवकरच तो भुल भुलैय्या 2, फ्रेङी, शहजादा आणि सत्यनारायण की कथा” या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.