“मूलगी झाली हो” कार्यक्रमात किरण माने यांची व्यक्तिरेखा साकारणार हा अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

स्टार प्रवाह वाहिनीवरील “मूलगी झाली हो” या मालिकेतील अभिनेते किरण माने यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे आणि त्यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी बर्याच चर्चा होत आहेत.

या मालिकेच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार किरण माने हे मालिकेतील महिला कलाकारांसोबत गैरवर्तन करत होते आणि अपशब्द वापरायचे. यासाठी किरण यांना अगोदरच बजावून सांगण्यात आले होते. मात्र तरीदेखील त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांनी अखेर नाइलाजास्तव हे पाऊल उचलले. तर आता ह्या मालिकेत किरण माने यांच्या ऐवजी अभिनेता आनंद विकास अलकुंटे पाटील ही भूमिका साकारतील.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्याची मालिकेतून झाली हकालपट्टी? राजकीय भूमिका घेतल्याचा होत आहे त्याच्यावर आरोप

“मूलगी झाली हो” या मालिकेत अभिनेत्री आनंद विकास अलकुंटे पाटील हे भूमिका साकारणार आहेत. अजूनपर्यंत प्रोडक्शन हाऊस कङून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद याने यापूर्वी “रुद्रम” या मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. त्याचप्रमाणे त्याने अनेक मराठी चित्रपटांत सुद्धा काम केले आहे.

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर या मालिकेचे एक नवीन पोस्टर शेयर करण्यात आलं होतं. ज्या मधून किरण माने यांना काढून टाकण्यात आले होते. किरण यांनी साकारलेल्या विलास पाटील या भूमिकेसाठी नेहमीच त्यांचे प्रेक्षकांमध्ये प्रचंड कौतुक होत होते. तर आता आनंद अलकुंटे हे विलास पाटील ही भूमिका योग्य प्रकारे साकारू शकतील का, असा प्रश्न प्रेक्षक वर्गाला पडला आहे.

See also  पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment