फक्त 17 व्या वर्षी आई बनली होती सलमान खान सोबत काम केलेली हि अभिनेत्री…
बॉलीवुड च्या चंदेरी दुनियेत असे काही चित्रपट होऊन गेले, जे एवढे सुपरहिट ठरले की चाहते आजदेखील ते चित्रपट तितक्याच आवडीने पाहणे पसंत करतात. असाच एक चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला होता. ज्याचे निर्देशक सूरज बङजात्या होते आणि तो चित्रपट होता “मैंने प्यार किया”. या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री आणि अभिनेता सलमान खान हे लीङ भूमिकेत होते. या दोघांची ही जोङी चाहत्यांना भरपूर आवडली होती.
इतकंच नव्हे तर हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि त्याने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. म्हणून तर चाहते आजदेखील हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. सलमान विषयी भाग्यश्री यांचा हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला आणि ते दोघेही अगदी सुपरस्टार बनले.
मित्रांनो तुम्हांला ठाऊक आहे का, “मैंने प्यार किया” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक असा सीन देखील होता. ज्यामुळे भाग्यश्री सेटवर रडू लागली होती. या चित्रपटात भाग्यश्री म्हणजे सुमन ला सलमान खान म्हणजेच प्रेम ला मीठी मारायची होती. तेव्हा हा सीन करण्याआधीच भाग्यश्री खूप रडू लागली होती.
अभिनेत्री भाग्यश्री हिने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की,”तो सीन करण्याआधी मी खूप घाबरली होती. त्यामुळे मला खूप रडू येत होते. अशातच तेव्हा निर्देशकांनी मला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले की,”मी एक जुन्या विचारांचा सन्मान ठेवणाऱ्या कुटुंबातील मूलगी आहे. साधारण चुङीदार घालणे, या संस्कारात वाढलेली मी एखाद्या मुलाला मीठी कशी मारू शकते. म्हणून मला भीती वाटते.”
या चित्रपटात भाग्यश्री आणि सलमान च्या जोडीला चाहत्यांनी अगदी ङोक्यावर घेतले होते. मैंने प्यार किया या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भाग्यश्री निर्देशक हिमालय दासानी सोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघेही एकमेकांना ङेट करत होते. अभिनेत्री भाग्यश्री हिने सांगितले की, या चित्रपटात सुमन ची जी परिस्थिती होती. तीच परिस्थिती माझी रियल लाइफ मध्ये होती.
मी घरी आमच्या रिलेशनशिप विषयी सांगण्याआधीच माझ्या घरी सर्व समजले होते. त्यामुळे मला हिमालय ला भेटू दिले जात नव्हते.” कारण तिच्या घरचे खूप नाराज होते. या परिस्थितीत भाग्यश्री व हिमालय यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. एवढंच नव्हे तर फक्त 17 वर्षांची असताना भाग्यश्री गरोदर राहिली होती आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.