कतरिना-विक्की यांच्या शाही विवाह सोहोळ्यात बॉलीवूडमधील हे दिग्गज राहणार गैरहजर, जाणून घ्या यामागील कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ट्रेडिंग कपल विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ङिसेंबर मध्ये हे दोघेही आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. यांच्या लग्नाची तारीख जरी अजून निश्चित झाली नसली तरीही त्यांच्या या शाही विवाहाची जोरात तयारी सध्या सुरू आहे. राजस्थान मधील जयपूर मध्ये हा शाही विवाह मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.

या विवाहसोहळ्याचे आमंत्रण आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना पाठवण्यात आले आहे. मात्र तरीही बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी मात्र या विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच या लग्नात कोण उपस्थित राहणार आहे, याची यादी जाहीर झालेली आहे. तर यामध्ये कतरिना चे खूप जवळचे मित्र हजर राहू शकणार नाहीत, असे म्हटले जात आहे. म्हणून कतरिनाचा आपल्या लग्नाच्या दिवशीच चेहरा पडणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

See also  जेव्हा अक्षय कुमारचा एका लव्हलेटरमुळे उडाला होता मजाक, त्या लव्हलेटरमध्ये अक्षयने लिहिले होते असे काही कि...

यामध्ये सर्वांत पहिले नाव म्हणजे बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान याचे आहे. अभिनेता सलमान खान हा एकेकाळी कतरिनाचा अगदी जवळचा खास मित्र होता. परंतु त्यांच्यातील दुराव्याने तो या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे दुसरे नाव आहे खिलाडी अक्षयकुमार.

नुकताच प्रदर्शित झालेल्या “सूर्यवंशी” या सिनेमात कतरिना व अक्षय यांनी एकत्र काम केले आहे. यापूर्वीही या दोन स्टार्स नी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. परंतु तरीही अक्षयकुमार या लग्नाला उपस्थित राहणार नाही. त्याचे कारण म्हणजे कतरिना च्या विवाहादरम्यान अक्षय आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त असणार आहे. त्यामुळे त्याला लग्नासाठी वेळ काढणे जमणार नाही.

अभिनेता अजय देवगण हा सुद्धा फारसा काही बॉलीवुड मधील फंक्शन मध्ये दिसत नाही. प्रमोशन कार्यक्रमांशिवाय इतर कुठेही जाणे त्याला आवडत नाही. शाहरूख व कतरिना चे सुद्धा खूप छान बॉन्डिंग आहे. परंतु सध्या आर्यन खान मुळे शाहरूख देखील खूप व्यस्त आहे. त्यामुळे तो देखील या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. आमीर खान सुद्धा आपल्या “लाल सिंह चङङा” या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याचे देखील कतरिना व विक्की यांच्या लग्नाला उपस्थित राहणे, कठीण आहे.

See also  अमीर खान तिसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, होणारी पत्नी आहे स्वतःच्या मुलीपेक्षा 5 वर्षांनी लहान!

तुम्हांला ठाऊक आहे का, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या विवाहानंतर आता इंडस्ट्रीमधील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कपल देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत, असे म्हटले जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment