लग्न विधी सुरु असताना नवरी अचानक सरकारी नोकरीच्या मुलाखतीसाठी निघून गेली, त्यानंतर जे घडले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आयुष्याची खरी मजा म्हणजे “नोकरी”. ही असेल तर आयुष्यात गोडी वाटते. परंतु जर नोकरी नसेल तर मात्र आयुष्याची “सजा” होते. आजकाल तर प्रत्येकजण ह्या तीन अक्षरी शब्दांच्या “नोकरी” च्या शोधात असतो.

परंतु नोकरी काही मिळत नाही. आणि आपल्यामागील साडेसाती काही सुटत नाही. मात्र काहीजण आपल्या सरकारी नोकरीसाठी अगदी रांत्र- दिवस एक करतात. परंतु ती मिळवणे देखील काही सोपे काम नाही.

“सरकारी नोकरी” म्हणजे आयुष्यात देवाने आपल्याला दिलेली उज्ज्वल भविष्याची संधी. तर ही संधी ज्यांना मिळते, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालचं म्हणून समजा. मित्रांनो सरकारी नोकरीसाठी लोक कितीतरी ‘ख’टा’टो’प’ करतात. अगदीच म्हणजे काहीजण तर लग्नाचा मंडप देखील सोडण्याची तयारी ठेवतात. अशीच एक घङलेली सत्य घटना आज आम्ही आमच्या लाडक्या मित्र- मैत्रीणींना सांगणार आहोत.

See also  लग्नात नवरदेवाने केले असे काही कि नवरीने अचानक दिला लग्न करण्यास नकार, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

उत्तरप्रदेश राज्यातील गोंडा येथील एक नवरी मुलगी चक्क लग्न मंङपातून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सोडून चक्क काऊंसलिंगसाठी निघून गेली. सर्वांत जास्त चांगली गोष्ट तर ही आहे की, त्या नवऱ्या मूलीला नोकरी देखील मिळाली. त्यानंतर जेव्हा ती पुन्हा परतली, तेव्हा मात्र ती सरकारी शिक्षिका बनली होती. त्या मुलीच्या घरच्यांनी ती आल्यावर तिच्या लग्नाचे अपूर्ण विधी पूर्ण केले व तिची आपल्या सासरी पाठवणी केली.

गोंडा रामनगर बाराबंकी येथे राहणाऱ्या प्रज्ञा तिवारी ही मेहंदी सजवलेल्या आपल्या सुंदर हातांमध्ये आपल्या या सरकारी नोकरीची सर्व कागदपत्रे सांभाळत फॉर्म भरताना दिसली. खरं तर गोष्ट अशी होती की, प्रज्ञाने आपल्या पतीसोबत सात फेरे तर घेतले होते, त्यानंतर सकाळी 5 वाजता जेव्हा लग्नाच्या विधींना सुरुवात झाली, तेव्हा मात्र तिला आपला लग्न मंडप सोडून गोंडा येथील बीएसए ऑफिसमध्ये जावे लागले. येथे प्रज्ञाची काऊंसलिंग होणार होती.

See also  मा'रण्याची ध'मकी देणाऱ्या महिलेला दुकानदाराने जबरदस्त चोपले, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल...

तसेच तिच्या काऊंसलिंग शेड्युलची तारीख आणि वेळ ही आधीच निश्चित होती. त्यामुळे प्रज्ञाला सात फेरे घेतल्यानंतर बाकीच्या लग्न विधींना अर्धवट सोडून काऊंसलिंगसाठी जावे लागले. पण जेव्हा तिची काऊंसलिंग पूर्णपणे पार पङली, तेव्हा तीला विधीवत सासरीही पाठवण्यात आले.

प्रज्ञाने काऊंसलिंगच्या रांगेत उभी राहून आपले सर्व महत्त्वाचे पेपर्स चेक करून घेतले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक नव्हे तर दोन गोष्टींचा आनंद झळकत होता. वधूच्या रूपातील प्रज्ञाचा ओसंडता आनंद पाहून तेथील शिक्षण अधिकारी इंद्रजीत प्रजापती यांनी तिला नव्या नोकरीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व “कालच लग्न झाले आणि आज नोकरी देखील मिळाली, वाह नशीब असावे तर तुझ्यासारखे” असे म्हणत तिचे गोड कौतुकही केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  आपल्या ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केल्यामुळे "या" प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी होत आहे जबरदस्त ट्रोल...

Leave a Comment