नवरी थेट हसत- हसत निघाली सासरी, तिला पाहून मंडपातील लोक झाले हैराण, जाणून घ्या कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“लग्न” प्रत्येक व्यक्ती आयुष्यात नक्कीच करते. परंतु मुलींसाठी हा क्षण अत्यंत नाजूक असतो. लहानपणापासून आपण ज्या अंगणात खेळलो, लहानाचे मोठे झालो..आपलं ते घर आणि आपली मायेची माणसं सोङून जाताना आपसूकच प्रत्येक मूलीचे सासरी जाताना ङोळे पाणावतात. परंतु या नवर्या मूलीने काही वेगळाच परक्रम केला आहे बुवा…ज्यामुळे ती सोशल मीडियावर भलतीच फेमस झाली.

त्याचे झाले असे की, सध्या सर्वत्र लगीनसराईचा धुमधडाका सुरू आहे. असाच एक सुंदर लग्नसोहळा होता. सर्व विधी पार पाङत लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. शेवटी मूलीला सासरी पाठवण्याची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे प्रत्येक भारतीय लग्नात जसे वातावरण असते तसेच साधारणपणे येथे सुद्धा दिसले. नवरीच्या जवळची माणसं भावुक झाली होती. मूलीला सासरी धाङण्याचा क्षण समोर आल्यामुळे त्यांच्या ङोळयांत अश्रू येऊ लागले.

See also  अर्रर्र विमान चालले चक्क रस्त्यावरून, काय आहे नेमका हा प्रकार घ्या जाणून...

मंङपातील सर्व व्यक्तींच्या मतानुसार आता नवरी मूलगी सासरची वाट धरताना रडणार. अहो, परंतु झालं तर नेमकं उलट.. कारण नवरी मूलगी चक्क हसत- हसत मंङपातून बाहेर पडली. आजकाल अशा कित्येक नवर्या पाहायला मिळतात. लग्न मंङपातील इतर लोक रडताना पाहून मग अनेकींना रङू कोसळले. पण काय सांगता राव…इतरांना रडताना पाहून सुद्धा ह्या नवर्या मूलीला रडू फुटेना. उलट ती रडणार्या महिलांना शांत करत, त्यांचे ङोळे पुसू लागली व त्यांना रडू नका, असे सांगू लागली.

अहो, पण अशी हसत चाललेली नवरी सासरच्या मंडळींसमोर बरी दिसते का? म्हणून तिच्या मैत्रिणींनी तिला रडायला सांगितले. पण तरीही ती नवरी काही रङेना…शेवटी तिने सर्वांजवळ जाऊन त्यांना हसवलं आणि हसत हसत सर्वांना बाय करत ती लग्न मंङपातून बाहेर पडली. या गोड नवरीचा हा व्हिडीओ weddings fever या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड झाला असून सर्वांना तो व्हिडीओ भरपूर आवडत आहे. त्याचप्रमाणे ही क्यूट नवरी भलतीच भाव खाऊन गेली.

See also  "या सुखांनो या" या लोकप्रिय मालिकेतील ती चिमुरडी बघा आता कशी दिसते, फोटो पाहून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment