“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत काम करणारं हे जोडपं अडकलं लग्न बंधनात ! फोटो होतायत व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

तुळशीचं लग्न झालं रे झालं आता सगळीकडे लग्नाचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. ठरलेल्या जोडीदारा सोबत लग्न बंधनात अडकून आयुष्याची सुरवात अनेक जण करत आहेत. त्यामध्ये कलाकार मंडळी सुद्धा मागे नाहीत. बॉलिवूड तर आघाडीवर आहेच.

गेल्या आणि या चालू वर्षी कोरोना असूनही अनेकांनी लग्न केले आहे. या वर्षाच्या शेवटाला सुद्धा अनेक जण लग्न करणार आहेत. त्यामध्ये विकी कौशल आणि कतरिना यांची नावे समोर येत आहेत. त्याचसोबत रणबीर कपूर आणि आलिया सुद्धा त्याच चर्चेत आहेत. यामध्ये मग मराठी इंडस्ट्री तरी कश्याला मागे राहील ?

मराठी मध्ये सुद्धा बरीच कलाकार जोडपे लग्न करून आयुष्याला सुरुवात करत आहेत. त्यात नुकतंच एका मराठी टेलिव्हिजन वर काम करणाऱ्या एका जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर चला मग जाणून घेऊया की कोणती जोडी आहे ज्यांनी आयुष्याची आनंदाने वैवाहिक सुरुवात केलेली आहे.

See also  फोटोतील या बालकलाकाराला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि नवरा निर्माता, नाव जाणून थक्क व्हाल!

जय जय स्वामी समर्थ ही मालिका कोण कोण बघत आहे ? असा एकही स्वामी भक्त नसेल की तो ही मालिका बघत नसेल. तर त्यामध्ये दोन असे जोडपं कलाकार आहे की ते नागपुरात लग्न बंधनात अडकलं आहे. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड असे व्हायरल होत आहेत. अनुज ठाकरे व अश्विनी गोरलेसह. या दोघांना सर्वजण ओळखत असालच. कारण वाचकांनो यांनी अत्यंत कमी काळात आपला एक छानसा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा दोघे चांगले ऍक्टिव्ह असतात.

तर त्या दोघांनी अखेर काल नागपुरात लग्न गाठ बांधलेली आहे. या लग्नाला नातेवाईक व मित्रमंडळी सोबत मराठी सिनेसृष्टी व टेलिव्हिजन नाटक इंडस्ट्री मधील बरेच से सितारे कलाकार आले होते. ज्यामध्ये अभिनेत्री विजय बाबर ( vijya babar ) जान्हवी किल्लेकर तसेच चला हवा येऊ द्या फेम अंकुश वाढवे सुद्धा होता.

See also  "आई कुठे काय करते" या मालिकेचा होणार अशाप्रकारे शेवट, अरुंधतीने व्यक्त केल्या आपल्या भावना..

अश्विनी गोरलेसह एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. ती सध्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सध्या काम करत आहे. याआधी तिने छोटी मोठी कामे केलेली आहेत. तर अनुज ठाकरे हा एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहे. याआधी त्याने कलर्स वरील कॉमेडी ची बुलेट ट्रेन मध्ये काम केलेले आहे.

ज्यामध्ये त्याने उत्तम असे विनोदी स्किट सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. त्याचसोबत क्राईम पेट्रोल मध्ये सुद्धा बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. तर या दोघांना पुढील वाटचाली साठी हार्दिक अश्या शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment