तेव्हा शरद पवारांनी म्हटले होते; ‘पंकजा मुंडे या राजकारणातील दीपिका पदुकोन आहेत’

आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यावर टी’का केली की छोट्या नेत्याला आपोआप बळ मिळत आणि त्याची दखल घेतली जाते. महाराष्ट्रात अनेक नेते असे आहेत की, जे शरद पवारांवर टी’का करत करत मोठे झाले. अर्थात नंतरच्या काळात त्यांनी विविध मुद्दे उचलून आपला व्याप वाढवला. मात्र शरद पवारांवर टी’का केल्याने आमची दखल घेतली गेल्याचे अनेक नेत्यांनी खाजगीत कबूलही केलेले आहे.

941767 sharad pawar dna

राज्यातील पवारांच्या पक्षातील आणि विरोधातील अनेक जुने आणि दिग्गज असणारे अनेक नेते आजही असेच म्हणतात की, पवार हे पोलीसांसारखे आहेत. त्यांच्याशी फार मैत्रीही चांगली नाही आणि फार दुष्मनीही चांगली नाही. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख आणि माजी ऊपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनीही आपल्या कार्यकाळात पवारांवर मोठ्या प्रमाणात टी’का केली.

17 ऑगस्ट 2015 रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शरद पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विलासराव देशमुख यांच्याविषयी बोलत होते. हा कार्यक्रम होता, विलासराव देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा…

READ  'तिथे' पडली होती ठाकरे आणि राणे वा'दा'ची ठिणगी; राज सह वहिनीही होत्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात...

IndiaTvd58eb7 pankaja

या कार्यक्रमाला विविधपक्षीय अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विलासराव देशमुखांच्या आठवणींना सगळ्यांनी उजाळा दिला. मात्र भाषणात बोलत असताना पंकज मुंडे यांनी मध्येच शरद पवारांचे कौतुक केले.

चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमारांचे जे स्थान आहे तेच जेष्ठ नेते शरद पवार यांचे राजकारणातील स्थान असल्याचे पंकजा यांनी म्हटले. पवार यांनी राजकारणात आणि एकूण आयुष्यात पंकजा मुंडेंपेक्षा नक्कीच काही उन्हाळे-पावसाळे जास्त बघितले आहेत. त्यामुळे हजरजबाबी असणाऱ्या पवारांनी लगेचच आयडिया केली.

IndiaTvd58eb7 pankaja

या कार्यक्रमाला विलासराव यांचे तिन्ही सुपुत्र उपस्थित होते. आमदार आणि मंत्री अमित तसेच आमदार धीरज आणि मराठमोळे अभिनेते रितेश देशमुख यावेळी व्यासपीठावर होते.

भाषणापूर्वी शरद पवारांनी केलेल्या कृतीने स्टेजवरील मान्यवर तर चमकलेच परंतु उपस्थित असलेले लोकही बुचकळले. हिंदी सिनेमात आपले कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या रितेशला शरद पवारांनी जवळ बोलवून घेतले. राजकीय व्यासपीठ असल्याने अमित आणि धीरज यांना बोलावले असते तर कुणाला काहीच वाटले नसते पण नेमकं भाषणापूर्वी रितेशला बोलावले आणि संवाद साधल्याने उपस्थित लोकही जरा आश्चर्यचकित झाले.

READ  'तब ये हरामजादा शरद पवार सीएम नही था' वाचा, का आणि कसे झाले शरद पवार पाकिस्तानचे लक्ष्य...

1Pankaja 20Munde 20sharad 20pawar

अर्थात पवार रितेशला जे विचारत होते. त्यामुळे रितेशही ग’ड’ब’ड’ले होते की, कुणाचे नाव सांगावे. मात्र एका अभिनेत्रीचे नाव सांगून रितेश यांनी विषय संपवला.
शरद पवार भाषणासाठी उठले. आपल्या भाषणात त्यांनी विलासराव देशमुखांचे कौतुक केले आणि त्यांचे नाते कसे होते, याविषयीही भाष्य केले. बोलता बोलता पवार म्हणाले की, विलासराव आणि गोपीनाथ मुंडे हे आदर्श मैत्रीचे उदाहरण होते. दोघांनी मराठवाड्याच्या प्रश्नासाठी सं’घ’र्ष केला आहे. तेच काम पंकजा आणि अमित यांनी पुढे न्यावे. तसेच सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोन यांचे जे स्थान आहे तेच पंकजा मुंडे यांचे आहे.

या वाक्यानंतर स्टेजवरील मान्यवरांसह समोर बसलेल्या लोकांमध्येही हशा पिकला. पंकजा मुंडेंनीही पवारांच्या या वाक्याला हसून दाद दिली. पुढे पवारांनी स्पष्ट केले की, मला सध्या चित्रपटसृष्टीत कोणाची चलती आहे हे माहिती नव्हते. म्हणून रितेश यांच्याशी चर्चा करून मी ही माहिती विचारून घेतली. 2015 मध्ये पंकजा महिला आणि बालविकास मंत्री होत्या. तसेच त्या लातूरच्या पालकमंत्रीही होत्या. त्यावेळी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे, असे म्हटले जायचे.

READ  राजकारणात नसते तर ‘तिथे’ असते राज ठाकरे; वाचा, स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलेली माहिती

Sharad pawar And pankaja munde

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment