भाभीजी घर पर है या मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले अचानक निधन, कारण ऐकून धक्का बसेल…
आज-काल कोणाच्याच आयुष्याच्या भरोसा उरलेला नाही आहे आज कोणी आहे तर उद्या कोणी नाही असा हा प्रकार मागील काही आणि या वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असेल कोरोना काळानंतर सगळ्यांच्या जीवनात खूप उलथापालच झाली. यावेळी खूप साऱ्या अभिनेत्यांना अभिनेत्रींना आपल्याला गमवावे लागले त्याचबरोबर काही गायकांचा देखील यात समावेश होता तर काहींची हत्या करण्यात आली. नुकताच एका माध्यमातून एक न्यूज येऊन पोहचली आहे सुप्रसिद्ध टीव्ही मालिका भाभीजी घर पर है या मालिकेतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे नुकताच नि’धन झाले आहे.
भाभीजी घर पर है या सुप्रसिद्ध मालिकेत आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना अक्षरशः हसवून सोडणारा अभिनेता दिपेश भान म्हणजेच मालिकेतील पात्र साकारणारे मलखान यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या फक्त ४१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाभीजी घर पर है या मालिकेत ते २०१५ पासून मलखान हे पात्र साकारत आहेत. त्यांच्या कॉमेडीचे खूप चाहते दिवाने आहेत. परंतु त्यांच्या अचानक असे जाण्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि एक छोटे मुल असं कुटुंब आहे.
मालिका जगतात भाभीजी घर पर है ही मालिका खूप नावाजलेली मालिका आहे या मालिकेतील टिकू आणि मलखान या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप भावली. पण आता यापुढे आपल्याला भाभी जी घर पर है या मालिकेत मलखान पाहायला मिळणार नाही आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत या मालिकेत पात्र साकारणारे मोहनलाल तिवारी म्हणजेच रोहिताश गौर म्हणाले की २३ जुलैच्या सकाळी दीपेश जी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. कारण २३ जुलैला शूट उशिराने सुरू होणार होते. म्हणून ते जिमला जाऊन आल्यानंतर डिरेक्टली क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड वर गेले.
रोहिताश पुढे म्हणाले की, दीपेश हे स्वतःच्या शरीराची खूप काळजी घेत असत. परंतु क्रिकेट खेळत असताना अचानक ते जमिनीवर को’सळले. त्यानंतर त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांना डॉक्टरांनी मृ’त झाल्याचे घोषित केले. मालिकेत पात्र साकारणारी भाभीजी म्हणजेच शुभांगी अत्रे यांनी दीपेश यांचा मृ’त्यू ब्रेन हॅ’मरेज मुळे झाला आहे असे सांगितले. आमच्या टीम कडून देखील दीपेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली.