“आई कुठे काय करते” मालिकेतील यशची बहीण सुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!
टेलिव्हिजनवरील “आई कुठे काय करते’ ही मालिका सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत चांगलीच प्रसिद्धीत झळकत आहे. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, यश, आप्पा, आजी, अभि आणि ईशा ही सगळी पात्रं प्रेक्षकांमध्ये बरीच फेमस आहेत. यामध्ये यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारत आहे. यापूर्वी अभिषेकने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, अभिषेक देशमुखची बहीण सुद्धा एक नामांकित अभिनेत्री आहे बरं……
अभिषेक देशमुखच्या बहिणीचे नाव अमृता देशमुख असे आहे. अमृताने टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासूनच आपल्या करियरची सुरुवात केली. “तुमचं आमचं सेम असतं” या मालिकेत अमृताला आपण पाहिलेच आहे. त्याचप्रमाणे अमृताने स्वीटी सातारकर या सिनेमातून चंदेरी पडद्यावर पदार्पण केले. अमृता व अभिषेक हे एकमेकांसोबतचे फोटोज् नेहमी शेयर करतात. या फोटोज् मधून या भावाबहिणीच्या नात्यातील गोडवा पाहायला मिळतो.
त्याचप्रमाणे अभिनेता अनिल देशमुखने याआधी “पसंत आहे मूलगी” या मालिकेत देखील काम केले. यामध्ये त्याने उत्कृष्ट भूमिका साकारली होती. तसेच अभिषेक ची ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीत सुद्धा उतरली होती. तसेच तो होम स्वीट होम या सिनेमात सुद्धा झळकला होता. 15 ऑगस्ट यामध्ये सुद्धा त्याने काम केले आहे. याव्यतिरिक्त अभिषेक देशमुख याने वेबसिरीज मध्ये देखील त्याने अप्रतिम अभिनय केले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.