“तारक मेहता..” मध्ये नवीन नट्टू काकांची एन्ट्री पडद्यावर दिसली पहिली झलक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो गेल्या कित्येक वर्षांपासून अतरंगी भूमिकांना खत पाणी घालत नव्याने हास्यफुलोरा फुलवून रसिकांना खळखळून हसवणारे कलाकार पडद्यावर आपले एक निराळे नाते निर्माण करत असतात. त्यांच्या आणि रसिकांच्या मनाचे धागे इतके घट्ट बांधले जातात की त्यांचा अभिनय रसिकांच्या चेहऱ्यावर आपोआप भाव उमटवतो. अनेक मालिका आणि शो लक्ष वेधून घेत असतात, पडद्यावर त्यांचे असणे हे अनेक प्रेक्षकांना मनोरंजित होण्याची संधी असते. असाच एक कार्यक्रम जो नेहमी एकाच वेळी अनेकांच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य आणतो. हा शो “तारक मेहता…” गेली अनेक वर्षे रंगभूमीवर आपली पकड मजबूत ठेवुन आहे.

“तारक मेहता..” मधील अनेक कलाकार व त्यांच्या अतरंगी भूमिका सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड लोकप्रिय असतात. शिवाय यातील सर्व कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनत असतात. या शो मधील अनेक सिन खूप लोकप्रिय झाले आहेत, यातुन जाती धर्म बाजूला सारून माणुसकी कशी जपावी याची सर्वाना सहज शिकवण मिळत असते. यामधून खरेतर खूप काही घेण्यासारखं आहे. प्रत्येक भूमिका त्या त्या ठिकाणी खास आहे त्यामुळे दयाबेन असो किंवा नट्टू काका असोत त्यांचे असणे या शोसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील 'गुरुनाथ' आता दिसणार या नवीन मालिकेत, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मित्रहो आज आपण यातील नट्टू काकांच्या बद्दल बोलणार आहोत, ही भूमिका जेठलालच्या दुकानात काम करत असणाऱ्या एका कामगाराची आहे, ही भूमिका आजवर घनश्याम नायक यांनी साकारली होती. मात्र घनश्याम नायक आता हयात नाहीत त्यामुळे या भूमिकेचा मालक अजून पर्यंत मिळाला न्हवता. नट्टू काकांची भूमिका साधी जरी असली तरीही खूप खास होती, त्यामुळे प्रेक्षक नट्टू काकांना खूप जास्त मिस करत होते. पण आता मित्रहो नव्या नट्टू काकांची एन्ट्री झालेली असून याची म्हणजे स्वतः निर्माता असित मोदीने दिली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये नट्टू काकांची ओळख। करून दिली आहे.

यामध्ये ते म्हणत आहेत “जुन्या नट्टू काकांनी नवीन नट्टू काकांना पाठवलं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना अफाट प्रेम दिलं आहे त्याच प्रमाणे नवीन नट्टू काकांना भरभरून प्रेम द्या.”. पण असित यांनी नवीन नट्टू काकांचे नाव अजून जाहीर केले नाही. ते कोण असतील हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. नट्टू काकांची भूमिका प्रेक्षकांसाठी खूप आपुलकीची आहे, अनेकांना ही भूमिका खूप आवडते. जुने नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे अनेकांचे लाडके होते, मात्र त्यांना कॅन्सर झाला असल्याचे समजले होते.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी अर्ध्यातून सोडले होते कोट्यवधींचे सुपरहिट चित्रपट, या अभिनेत्रीने तर निर्मात्यांनाच...

त्यांच्यावर किमोथेरपी देखील केली जात होती, याची माहिती त्यांचा मुलगा विकास याने दिली आहे. मागील वर्षी त्यांचे निधन झाले, पण आजही त्यांची आठवण नेहमी निघत असते. त्यांचे गळ्याचे ऑपरेशन झाले होते, त्यातून जवळपास ८ गाठी काढण्यात आल्या होत्या. उपचार करतेवेळी त्यांचे। निधन झाले होते. गेली १० वर्षे ते नट्टू काकांची भूमिका निभावत होते त्यामुळे प्रेक्षक आणि त्यांचे नाते खूप जवळचे आहे. आता नवीन नट्टू काकांसोबत देखील अशीच मैत्री होवो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment