खूप काळ टिकू नाही शकले या बॉलीवूड कलाकारांचे लग्न, आय अभिनेत्रीने तर फक्त ९ महिन्यात घेतला घटस्फो’ट…
बॉलीवुडच्या मायानगरीत कुणाविषयी केव्हा, कधी काय ऐकू येईल याचा काही एक नेम नाही बुवा…. न बॉलीवुडची मॉर्ङन अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे अमेरिकन सिंगर निक जोनस सोबत लग्न झाले होते. परंतु हल्ली त्या दोघांच्या नात्याविषयी काहीही ऐकू येत आहे. त्याचे कारण म्हणजे प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावरील आपल्या नावापुढील जोनस हे नाव काढून टाकले आहे.
त्यामुळे प्रियांका व निक यांचा घटस्फो’ट होणार आहे, अशा अफवांनी सगळीकडे धूमाकळ घातला आहे. मात्र हे काही पहिले असे प्रकरण नाही. कारण आतापर्यंत इंडस्ट्रीमधील अनेक विवाहित दाम्पत्यांमध्ये वादविवाद निर्माण होऊन त्यांचे रिलेशन अगदी टोकाला गेले आहे. आज आम्ही तुम्हांला अशाच काही कपल्स विषयी सांगणार आहोत.
अभिनेत्री रेखा :बॉलीवुडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा हिचे लग्न 1990 मध्ये दिल्लीतील बिजनेसमॅन मुकेश अग्रवाल सोबत झाले होते. मीडिया रिपोर्टस् नुसार मुकेश काही कारणास्तव ङिप्रेशन मध्ये होते. म्हणून त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे रेखाच्या लग्नाला एक वर्ष देखील पूर्ण झाले नव्हते, तेव्हाच ती विधवा बनली. रेखा व मुकेश यांचे नाते फक्त 11 महिनेच होते.
मल्लिका शेरावत : बॉलीवुडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी मल्लिका शेरावत ही देखील एक होती. तिचा विवाह पायलट किरण सिंह सोबत झाला होता. त्यांचे हे लग्न कसेबसे एक वर्ष टिकले. त्यानंतर मात्र त्यांचा घटस्फो’ट झाला. परंतु त्यामागील कारण मात्र समजू शकले नाही.
किशोर कुमार : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सिंगर आणि अभिनेते किशोर कुमार यांनी एकूण चार विवाह केले. त्यांनी तिसरा विवाह 1976 मध्ये योगिता बाली सोबत केला होता. मात्र हे लग्न 2 वर्षेच टिकले. असे म्हणतात की, योगिता ही मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रेमात पडल्याने ती किशोर कुमार यांना सोडून गेली होती.
मनिषा कोइराला : नेपाळी ब्यूटी क्वीन या नावाने प्रसिद्धीत असलेली अभिनेत्री मनिषा कोइराला हिने 2010 मध्ये बिजनेसमॅन सम्राट दहल सोबत लग्न केले होते. मात्र असे म्हटले जाते की, लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्यात एवढे वाद होऊ लागले की 2012 मध्ये त्यांचा घटस्फो’ट झाला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.