अमिताभ बच्चन यांच्या घरातील भिंतीवरील तो फोटो होतोय प्रचंड व्हायरल, त्या फोटोची किंमत आहे करोडोंमध्ये…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बिग बी अमिताभ बच्चन यांचा नावलौकिक फक्त आपल्या देशातच नव्हे तर जगभरात आहे. लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन यांचा अगदी पहिला नंबर लागतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा लाखोंच्या संख्येने चाहतावर्ग आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे आपले लेटेस्ट फोटोज् व व्हिडिओज ते नेहमी शेयर करतात. नुकताच दिपावली सणाच्या निमित्ताने अमिताभजींनी सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला होता. परंतु नवल म्हणजे, यावेळी चर्चा त्यांच्या फोटोची नव्हे तर त्यावरील पेंटिंगची होत आहे. तसेच या पेंटिंगची किंमत ही कोट्यवधींमध्ये आहे.
त्याचे झाले असे की, अमिताभ बच्चनजी यांनी सोशल मीडियावर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेयर केला आहे. या फोटोत त्यांचे संपूर्ण बच्चन कुटुंबीय दिसत आहे. म्हणून तर सोशल मीडिया युजर्सना त्यांचा हा फोटो खूप आवडला आहे. या फोटोमध्ये त्यांनी “हा फोटो शेयर करत संपूर्ण कुटुंब एकत्र सण साजरा करत आहे आणि एकत्र प्रार्थना करत आहे. दिपावली या सणाच्या तुम्हांला सर्वांना हार्दिक शुभेच्छा” असे कॅप्शन दिले आहे. पण तरीही युजर्सचे लक्ष मात्र त्यांच्या फोटोकडे नसून त्यामागील पेंटिंगकङे वेधले आहे.
ह्या बैलाची पेंटिंग पाहिल्यावर काहीजणांनी तर चक्क अमिताभजींना ट्रोल केले आहे. एक युजर्स तर म्हणत आहे की वेलकम चित्रपटातील मजनू भाईने ही पेंटिंग काढली आहे. त्याचप्रमाणे वायरल झालेल्या या पेंटिंगची किंमत ही 4 कोटी रूपयांच्या आसपास आहे. पंजाब मध्ये राहणारे मनजित बावा यांनी ती पेंटिंग काढली आहे.
चित्रकार मनजित यांना अशा पेंटिंग काढण्याची प्रेरणा ही पौराणिक कथा आणि सुफी फिलॉसॉफीमधून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पेंटिंग मध्ये काली, शिवा या देवतांच्या प्रतिमेचा समावेश आवर्जून असतो. तसेच प्राणी, निसर्ग, मनुष्य, बासरीच्या यांच्या सहअस्तित्तवाची झलक त्यांच्या पेंटिंग मधून होते. त्यांच्या सुंदर व आकर्षक पेंटिंगचा संपूर्ण जगातील प्रसिद्ध ॲक्शन हाऊसमध्ये लिलाव होतो. तेथे त्या विकल्या जातात.
Sotheby’s या ॲक्शन हाऊसमध्ये ह्या पेंटिंग साधारणतः 3 ते 4 कोटी रुपए किंमतीत विकल्या जातात. सध्या या पेंटिंगचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यावर काही युजर्सने तर बैलाचे पेंटिंग घरी ठेवण्यामागील हेतू सांगितला आहे. बैल म्हणजे एक वर्चस्व, आधार, ताकद, लाभ आणि यश व समृद्धी आशावादाचे प्रतिक आहे. इतकंच नव्हे बैलाचा फोटो हा घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते, असे म्हटले जाते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.