“करीना सोबत मी याच कारणामुळे लग्न केले”, सैफ अली खानने अखेर कबूल केल्या त्या सिक्रेट गोष्टी…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील नवाब अभिनेता सैफ अली खान हा आपल्या करियर पेक्षा अधिक खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अर्थातच करीना कपूर सारखी अदाकारी पत्नी मिळाल्यावर सैफ चे अधिकाधिक लाइमलाइट मध्ये राहणे ठरतेच. तुम्हांला ठाऊक आहे का, सैफ अली खानचा पहिला ङेब्यू चित्रपट “परंपरा” हा रिलीज होण्याआधीच तो अमृता सिंह च्या प्रेमात पडला होता.
या दोघांचीही भेट एका फोटोशूट दरम्यान झाली होती. त्यानंतर मग ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. पुढे 20 वर्षीय सैफ अली खानने 32 वर्षीय अमृता सिंहला लाइफ पार्टनर बनवले. परंतु सैफ अली खान व अमृता सिंह यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. शेवटी 2004 साली ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले.
अमृता सिंह व सैफ अली खान यांचे लग्न तुटण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्या दोघांच्याही वयातील अंतर हे होते, असे म्हटले जाते. अमृता ही सैफ पेक्षा वयाने खूप मोठी असल्याने त्यांचे आपापसांत जमत नव्हते. त्यानंतर मग सैफ अली खान ने स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूर सोबत विवाह केला.
अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीमध्ये आपण स्वतःपेक्षा लहान असलेल्या बेबो सोबत लग्न का केले, याविषयी सांगितले होते. त्याचसोबत त्याने आपल्या पहिल्या लग्नात कोणकोणत्या गोष्टी मिस केल्या, हे सुद्धा सांगितले. आपल्या अनुभवावरून सैफ अली खान ने सर्व पुरूषांना स्वतःपेक्षा लहान असलेल्या महिलेसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच त्याने सांगितले की,”अशा व्यक्ती सोबत लग्न करणे नेहमी चांगले जी व्यक्ती फन लविंग आहे. त्याचसोबत सुंदर आणि नॉन जजमेंटल देखील असेल. करीना मध्ये या सर्व गोष्टी आहेत, म्हणून मी तिच्यासोबत लग्न केले, हे सैफ ने तेव्हा कबूल केले होते.
अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर यांनी 2012 मध्ये लग्न केले. टशन चित्रपटाच्या दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढत गेली. पुढे बराच कालावधी त्यांनी एकमेकांना ङेट केले. तर आता या क्यूट कपलला दोन गोंडस मुलं आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.