“तारक मेहता” मधील जेठालाल यादिवशी सोडणार अखेर हा शो, यामागील कारण ऐकून बसेल धक्का!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत पॉप्युलर शो आहे. 2008 मध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा शो मागील 13 वर्षांपासून चाहत्यांचे सातत्याने मनोरंजन करत आहे. या शो मधील कलाकारांनी आपल्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. फक्त प्रमुख व्यक्तिरेखाच नव्हे तर लहानसहान भूमिका निभावणार्या कलाकारांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात आपलं घर निर्माण केले.

आतापर्यंत या शो मधील अनेक कलाकार निघून गेले, परंतु जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे मात्र अजूनपर्यंत टिकून राहिले. दिलीप यांनी आपल्या करियरच्या कारकीर्दीत अनेक मालिका केल्या. परंतु त्यांच्या अभिनयाला “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो ने चार चाँद लावले. आपल्या एका मुलाखती दरम्यान दिलीप जोशी यांनी या शो बद्धल अनेक अनोख्या गोष्टी सांगितल्या आहेत. 2008 मध्ये या शो च्या सुरुवातीपासूनच चाहत्यांनी त्यांच्यावर इतकं प्रेम केलं की काही वेगळे सांगायची मुळीच गरज नाही.

See also  प्रियंका चोप्राने दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक..., तब्बल 100 दिवसांनी आली घरी...

इतक्या वर्षात या शो मध्ये जेठालाल यांची जागा दुसरे कुणीही घेऊ शकले नाही. मात्र इतकी वर्षे ते या शो मध्ये टिकून राहण्यामागील नेमकं कारण तरी कोणतं बरं?? असा प्रश्न बहुतेकांना पङला आहे. याविषयी सांगताना दिलीप जोशी म्हणाले की,”या शो चा भाग होण्यात एक वेगळीच मजा आहे. जोपर्यंत मला त्याचा आनंद घ्यायला मिळत आहे, तोपर्यंत मी तो घेत राहील. ज्यादिवशी मला असे वाटेल की आता या शो मुळे मी बोर होत आहे, त्यादिवशी मी हा शो कायमस्वरूपी सोडून देईल.”

याविषयी बोलताना पुढे दिलीप जोशी म्हणाले की,हा शो चांगल्याप्रकारे चालत आहे. मग विनाकारण का बरं काम करणं सोडायचे. ते म्हणतात की,”या शो मुळे त्यांना रसिकांचे प्रेम लाभले आहे. जे त्यांना विनाकारण घालवायचे नाही. या शो सोबत आपले खास नाते असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे एखादे खूप मोठे कारण असल्याखेरीज मी शो सोडणार नाही”, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

See also  ‘तारक मेहता...’ मधील जेठालालची भूमिका नाकारल्याबाबत राजपाल यादव म्हणाले- मी प्रत्येक भूमिका...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment