“अरे ताई म्हण मला ताई….” अभिनेत्री जेनेलिया देशमुखचा तो व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत क्यूट कपल म्हणून अभिनेत्री जेनेलिया ङिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांना ओळखले जाते. 2012 मध्ये या कपलने एकमेकांसोबत विवाह केला. कित्येकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ब्युटीफूल कपलचे प्रेम सुद्धा दिसून येते. जेनेलिया ने आपल्या मुलांसोबत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला होता. तसेच आता तिने पुन्हा एक नवीन व्हिडीओ शेयर केला आहे. तिचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तर कित्येकांनी खूप छान कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

अभिनेत्री जेनेलिया ङिसूजा हिने आपल्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक रील व्हिडीओ तयार केला आहे. “तू एवढी सुंदर दिसते तर तुला परी म्हणू की सुंदरा….” हा प्रश्न विचारताना ती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर “अरे ताई म्हण….ताई” असे म्हणत जेनेलिया जोरजोरात हसू लागली. या व्हिडिओ मध्ये ती सुद्धा खूप सुंदर दिसते. परंतु तिचा निरागस स्वभाव आपले चित्त वेधून घेतो. अनेक युजर्सने हा व्हिडीओ पाहिल्यावर जबरदस्त कमेंट करत प्रतिसाद दिला आहे.

तरीही काही दिवसांपूर्वीच जेनेलिया ने तिचा मोठा मुलगा रियानसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला होता. यामध्ये जेनेलिया व्हिडीओ च्या सुरूवातीला “Hi Guys, ही मी आहे आणि हा….तू कोण आहेस रे ?? असा प्रश्न विचारताना दिसते. आपली आई जेनेलिया हिचा हा प्रश्न ऐकून जेनेलिया काही वेळासाठी तर गोंधळात पडतो, परंतु त्याचे एक्स्प्रेशन्स मात्र पाहण्यासारखे असतात.

See also  22 वर्षांपूर्वी या तारखेला लग्न करणार होता सलमान खान, पण अचानक असं काही घडलं आणि...

“तुझे मेरी कसम” या चित्रपटात रितेशने आणि जेनेलिया ने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेयर केली होती. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने ते पहिल्यांदाच विमानतळावर भेटले होते. पण त्यावेळी जेनेलियाचे वागणे रितेशला आवङले नव्हते. तेव्हा त्याने स्वतःहून जेनेलिया जवळ मैत्रीचा हात पुढे केला होता, परंतु जेनेलिया तेव्हा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. मात्र नंतर त्यांना जसजसे एकमेकांचे स्वभाव पटत गेले. तसतसे ते दोघेही एकमेकांच्या आणखी जवळ येत गेले. 2012 मध्ये त्या दोघांनी एकमेकांसोबत विवाह केला आणि आता त्यांना रियान आणि रेहान ही दोन मुलं आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  50 वर्षीय एका वयोवृद्ध बिजनेसमॅनच्या प्रेमात वेडी होती अक्षयकुमारची बहीण, पुढे जे घडले ते ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment