प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेची पत्नी आहे खूपच सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या महाराष्ट्राला अनेक प्रख्यात कलाकारांचा वारसा लाभलेला आहे. मग ते संगीत असो वा नृत्य किंवा मग अभिनय असो… स्वकतृत्वावर व अत्यंत मेहनतीने आपल्या कलेच्या जोरावर रसिकांच्या मनावर राज्य करणे, ही एक कला जणू आपल्या कलाकारांनी अंगी जोपासली आहे. असाच मराठमोळा दणदणीत दणकट आणि जबरदस्त वजनदार असा आवाज म्हणजे आदर्श शिंदे. शिंदेशाहीची कीर्ती फक्त आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या देशभरात पसरलेली आहे.

आदर्श शिंदे यांना अगदी बालपणापासूनच त्यांचे वडील आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्याकडून गाण्याचा अप्रतिम वारसा लाभला आहे. त्यामुळे आपल्या वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षापासूनच त्यांनी स्टेज शो दरम्यान गायनाची सुरुवात केली होती.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा जुना फोटो होतोय खूपच व्हायरल अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

“देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही” या गाण्याने आदर्श यांना एक अनोखी ओळख मिळवून दिली. आदर्श सुद्धा इतर कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. आपले नवनवीन अपडेट्स तो चाहत्यांशी आवर्जून शेयर करतो. तसेच तो स्वतःचे फोटोज् देखील शेयर करतो. तुम्ही जर आदर्श च्या सोशल मीडियावर एक नजर टाकली, तर तुम्हांला आदर्शने आपल्या पत्नीसोबत घालवलेल्या अप्रतिम मोहक क्षणांचे फोटोज् सुद्धा पाहायला मिळतील.

dcG1DRhj

आदर्श च्या पत्नीचे नाव नेहा लेले असे आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, आदर्श व नेहाने एकमेकांसोबत अरेंज नव्हे तर लव्हमॅरेज केले आहे. 2015 साली आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने आदर्श- नेहा हे विवाहबद्ध झाले. यांच्या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती.

See also  "माहेरची साडी" या चित्रपट मराठी अभिनेत्री अलका कुबल आधी सलमानच्या या अभिनेत्रीला ऑफर केला होता, पण...

यामध्ये स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, रवी जाधव यांसारखे कलाकार उपस्थित होते. या सुंदर दाम्पत्याला एक गोंडस मुलगी सुद्धा आहे. तिचे नाव अंतरा शिंदे असे आहे. त्यांचे लग्नाचे कधीही समोर न आलेले व फारसे कुणीही न पाहिलेले फोटोज् समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नेहा व आदर्श हे अगदी मेङ फॉर इच अदर कपल वाटत आहेत.

जन्मोजन्मांतरीचे एकमेकांचे सोबती बनल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे झळकत आहे. त्यांचे हे रेशमी नाते लग्नानंतर तितकेच घट्ट झालेले व ते दोघेही एकमेकांची खूप काळजी करत असलेले पाहायला मिळते. म्हणून तर एक गोङगुलाबी दाम्पत्य म्हणून नेहा व आदर्श यांना ओळखले जाते. नेहा ही सुद्धा दिसायला अतिशय सुंदर व सालस आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांच्या प्रचंड लाईक्स व कमेंट्स पाहायला मिळतात. सतत आपल्या फॅशन व स्टाईलने ती आपल्या चाहत्यांना आकर्षित करते.

See also  मराठमोळ्या अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य सरकारला खडा सवाल, महाराष्ट्र शासनाच्या मनमानी विरुद्ध तीव्र शब्दांत सं'ता'प...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment