बिग बॉस 15 ची विजेती ठरली ही स्पर्धक, ट्रॉफीसह तिने जिंकले 40 लाख रुपयांचे रोख बक्षीस…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“बिग बॉस” हा एक धमाकेदार कॉन्ट्रोवर्शियल शो आहे. म्हणून तर देशभरात या शो चे प्रचंड फॅन्स आहेत. यंदाच्या बिग बॉस 15 चा विजेता हा निश्चितच जाहीर झाला आहे. खरं तर ही खूपच दिलासा देणारी बातमी आहे की बिग बॉस 15 या सीझनची ट्रॉफी तेजस्वी प्रकाश हिने जिंकली आहे. प्रतिक सेहेजपाल आणि तेजस्वी हे दोघेही या शो चे स्पर्धक होते. मात्र तेजस्वी ने प्रतिक पेक्षा प्रचंड मतं मिळवत बिग बॉस ची ट्रॉफी पटकावली आहे.

तेजस्विनीने ही ट्रॉफी जिंकताच सर्वांनी एकच जल्लोष केला. खरंतर तिला स्वतःला देखील या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मात्र नंतर तिला भरपूर आनंद झाला. तो आपल्याला फोटोज् मधून तिच्या चेहर्यावर पाहायला मिळत आहे. बिग बॉस च्या ट्रॉफीसोबतच तेजस्वीला 40 लाख रुपयांचे रोख बक्षीस देखील मिळाले.

See also  तब्बल 7 वर्षांनंतर हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता होणार बाप, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

तेजस्वी प्रकाशचा प्रियकर करण कुंद्रा हा सुद्धा टॉप 3 मध्ये होता. मात्र त्यानंतर तो बाहेर पडला. त्यामुळे फॅन्सना प्रतिक आणि तेजस्वी मध्ये चांगलाच अटीतटीचा खेळ पाहायला मिळाला. अखेर तेजस्विनीने प्रतिकला मागे सारत बिग बॉस 15 ची ट्रॉफी आपल्याच नावावर करून घेतली.

तेजस्वी प्रकाश हिने आतापर्यंत “स्वर्गीनी” आणि “सिलसिला बदलते रिश्तों का” या टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच “खतरों के खिलाङी 10” मध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला होता. आपण मनोरंजन क्षेत्रात काम करायचे, हा विचार तिने अगदी लहानपणीच आपल्या उराशी बाळगून ठेवला होता. त्यामुळे वयाच्या 18 व्या वर्षीच तिने आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली. त्याचप्रमाणे तेजस्वीला आपल्या बाबांकडून संगीताचा वारसा लाभल्याने ती एक उत्कृष्ट संगीतकार देखील आहे. तिला तिच्या आईवडिलांनी सतार आणि इतर वाद्ये वाजवायला देखील शिकवले आहे.

See also  कतरिना-विक्की यांच्या शाही विवाह सोहोळ्यात बॉलीवूडमधील हे दिग्गज राहणार गैरहजर, जाणून घ्या यामागील कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment