पुनित राजकुमारची अपूर्ण इच्छा पूर्ण करणार ‘हा’ अभिनेता, जबाबदारीपुढे दुःखाचा विसर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

साऊथ इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते पुनित राजकुमार यांचे शुक्रवारी नि’ध’न झाले. वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने पूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्यांचीच आठवण काढत आहे. त्याच्या चाहत्यांनी काळजावर दगड ठेवत त्याला अखेरचा निरोप दिला आहे. कारण तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा खास होता.

अभिनय क्षेत्रात असूनही त्याला समाजकार्याची खूप हौस होती. अनाथाश्रमांसह 1800 गरीब मुलांचा शिक्षणाचा खर्च तो स्वतः करायचा. त्यामुळे आता पुनित च्या निधनानंतर त्या सर्व 1800 मुलांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी अभिनेता विशाल याने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा तामिळ अभिनेता विशाल हा पुनित राजकुमारचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी नामांकित अभिनेता पुनित राजकुमार हा स्वीकारणार आहे.

See also  या व्यक्तीने जेनेलियाच्या कानशिलात लावली होती, म्हणून तब्बल 13 वर्षांनी रितेश देशमुखने घेतला बदला...

अभिनेता पुनित राजकुमार याने शुक्रवारी 29 ऑक्टोंबर रोजी हृदयवि’काराच्या आ’जा’रा’ने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत होते. परंतु आता दाक्षिणात्य अभिनेता विशाल ने स्वतः पुढे येऊन या विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची जबाबदारी दाखवली आहे. हैदराबाद मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना विशाल अत्यंत भावुक झाला. त्याने पुनित राजकुमारची आठवण काढत म्हटले की, तो फक्त अभिनेता नव्हता, तर तो एक खूप चांगला मित्र सुद्धा होता. पुनितचे असे अचानकपणे देवाघरी जाणे, हे फक्त चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे तर समाजासाठी देखील अत्यंत ध’क्का’दायक आहे.

विशालने त्याच्या आगामी enemy या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हे सांगितले. विशालचा नवा चित्रपट enemy थ्रिलर हा लवकरच येत आहे. याचे दिग्दर्शक आनंद शंकर हे आहेत. या चित्रपटात आर्या आणि विशाल हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्याशिवाय ममता मोहनदास, प्रकाश राज आणि मृदालिनी रवी हे सुद्धा यामध्ये दिसणार आहेत.

See also  अबब! काय सुंदर दिसते अभिनेत्री जान्हवी कपूर जिम सूटवर, पहा तिचे सुंदर फोटो...

अभिनेता पुनित राजकुमार हा त्याच्या फिल्मी कारकीर्दीसह इतर अनेक सामाजिक कार्यांसाठी देखील स्मरणात राहील. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने 45 मोफत शाळा, 26 अनाथाश्रम, 16 वृद्धाश्रम आणि 19 गोशाळा इ. स्थापन केले. त्याचप्रमाणे मागील वर्षी त्याने 1800 विद्यार्थ्यांची जबाबदारी सुद्धा स्वीकारली. तर आता अभिनेता विशाल याने ही सर्व जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला.

विशालने ट्विटरवर आपले दुःख व्यक्त करत लिहिले आहे की,”माझा चांगला मित्र पुनित राजकुमार राहिला नाही, यावर माझा विश्वास बसत नाही. त्याच्या आत्म्याला शांती लाभो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment