‘हे’ आहेत पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मधील सर्वात श्रीमंत मंत्री, नारायण राणे आहेत तिसर्‍या क्रमांकावर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात 43 खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. ज्यात 15 जण कॅबिनेट मंत्री आणि 28 जण राज्यमंत्री झाले आहेत. यात 36 नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर केंद्रातील एकूण मंत्र्यांची संख्या आता 78 झाली आहे. यात एकूण 11 महिलांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. यातील अनेक मंत्री गडगंज श्रीमंत आहेत. या लेखामध्ये आपण जाणून घेऊया कोण आहेतवपंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील सर्वात श्रीमंत मंत्री…

ज्योतिरादित्य सिंधिया:

Jyotiraditya Scindia Resigns Congress on Holi

पीएम मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य सिंधिया यांना नागरी उड्डाण मंत्रालय देण्यात आले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया सध्या मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, ज्योतिरादित्य 379 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. ही संपत्ती त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली आहे. वास्तविक ते सिंधिया राजघराण्यातील वंशज आहेत. स्वातंत्र्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाची मध्यप्रदेश मध्ये सत्ता होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलिकडेक कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करत 22 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा पासूनच त्यांना एखादे मोठी मंत्रिपद मिळू शकते याची चर्चा सुरू होती.

See also  अबब! या तरुणीला लसीचे एकाच वेळी तब्बल 6 डोस देण्यात आले, त्यानंतर जे घडले ते.....

पीयूष गोयल :

702797 goyalpiyush 071018

हे मोदी मंत्रिमंडळातील दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. पीयूष गोयल यांच्याकडे 95 कोटींची संपत्ती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पियुष गोयल यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते दोनपेक्षा जास्त मंत्रालये सांभाळत आहेत. त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि अन्न, ग्राहक व्यवहार व नागरी पुरवठा मंत्रालय यांचा कार्यभार  देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांची पदोन्नती केली आहे.

नारायण राणे :

3bd57df5340f191f166faa5a74ad7451 e1625840669986

मोदींच्या कॅबिनेटमधील तिसरे सर्वात श्रीमंत मंत्री नारायण राणे आहेत. त्यांची संपत्ती 87.77 कोटी आहे. मोदींनी त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी कालच पदभार स्वीकारत कामकाज सुरू केले आहे. नारायण राणे महाराष्ट्रातील मोठे नाव असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment