“तारक मेहता…” या शो संबंधित ह्या सिक्रेट गोष्टी ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क, एकदा नक्की वाचा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनवरील सर्वांचा लोकप्रिय असा भन्नाट शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” याला दिवसेंदिवस चाहत्यांची भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या या शो मधील पात्रांना तुम्ही- आम्ही सर्वजण अगदी चांगलेच ओळखतो. परंतु तरीही काही अशा गोष्टी आहेत, ज्या अजूनही कदाचित तुम्हांला ठाऊकच नसतील. त्या सिक्रेट गोष्टी माहीत करून घेतल्यावर तुम्ही म्हणाल की, अरेच्चा हे असं देखील आहे का…..चला तर मग जाणून घेऊया, त्या सिक्रेट गोष्टी :

पत्रकार पोपटलाल आहे तीन मुलांचा ‘वडील’ : तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये पोपटलालचे लग्न कधी बुवा होणार, हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे. मात्र आपल्या खऱ्या आयुष्यात अभिनेते श्याम पाठक (पोपटलाल) हे विवाहित आहेत. त्याचप्रमाणे त्यांना तीन मुलं सुद्धा आहेत. श्याम यांच्या पत्नीचे नाव रश्मी असे आहे. श्याम हे जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ङ्रामा मध्ये शिक्षण घेत होते, त्यादरम्यान तिच्यासोबत त्यांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले व त्यांनी नंतर एकमेकांसोबत 2003 मध्ये विवाह केला.

See also  "तारक मेहता..." मध्ये झाली नवीन पात्राची एंट्री, दयाबेन कि बबिताजींची भूमिका साकारणार ही अभिनेत्री?

जेठालाल पेक्षा वयाने ‘लहान’ आहेत बापूजी :
गोकुळधाम सोसायटीतील वयोवृद्ध बापूजी म्हणजेच अभिनेते अमित भट्ट हे शो मधील अभिनेते दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल पेक्षा व वयाने खूप लहान आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत मित्रांनो…या बाप- लेकात तब्बल 6 वर्षांचे अंतर आहे. 1974 मध्ये अमित भट्ट यांचा जन्म झाला. तर 1968 मध्ये दिलीप जोशी यांचा जन्म झाला होता.

खर्या आयुष्यात शिक्षक नव्हे तर इंजिनीअर आहे भिडे : गोकुळधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी आणि एक कङक शिक्षक ही पात्र मागील बहुतांश काळापासून अभिनेते मंदार चंदवाङकर साकारत आहेत. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, मंदार हे आपल्या खऱ्या आयुष्यात इंजिनीअर आहेत. एवढच नव्हे तर दुबईत त्यांनी तीन वर्षे इंजिनीअरचे काम सुद्धा केले आहे.

टप्पु आणि गोगी यांचे आहे हे नाते : भव्य गांधी (टप्पु) आणि समय शाह ( गोगी) हे दोघेही एकमेकांचे मामेभाऊ आहेत. परंतु भव्य गांधी याने 2017 मध्ये हा शो कायमचा सोडला. तर आता त्याच्या जागी टप्पुची भूमिका राज अनादकट हा साकारत आहे. इतकंच नव्हे तर, भव्य गांधी हा सर्वाधिक पेमेंट घेणाऱ्या बालकलाकारांमधील एक आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार तारक मेहता का उल्टा चश्मा या शो च्या प्रत्येक एपिसोडचे तो दहा हजार रुपये देखील घेत होता.

See also  "तारक मेहता.." मधील बबिताजी भ'डकल्या, शो मधून अचानक गायब होण्याचे सांगितले हे कारण, ऐकून थक्क व्हाल!

अशी झाली शो मध्ये ‘अय्यर’ यांची एन्ट्री : शो मध्ये कृष्णन सुब्रमण्यम अय्यर यांची भूमिका साकारणारे अभिनेते तनुज महाशब्दे हे या शो च्या लेखकांपैकी एक लेखक होते. आपल्या शो मध्ये बंगाली- तमिळ कपलला सहभागी करावे, ही दिलीप जोशी यांचीच आयडिया होती. त्यानंतर जी कमाल झाली, ती तर आपण पाहतच आहोत.

जर बापूजी हे जेठालाल बनले असते तर…. तुम्हांला ठाऊक आहे का, सुरूवातीला बापूजींना जेठालालची भूमिका साकारण्याचे काम देण्यात आले होते. परंतु त्यांनी मात्र त्या भूमिकेसाठी स्पष्ट नकार दिला. पुढे मग शो मेकर्स ने दिलीप जोशी यांना जेठालालची मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवडले. ज्याचे दिलीप जोशी यांनी सोनं केले.

कधीकाळी फक्त 50 रुपए कमावत होते दिलीप जोशी : आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेते दिलीप जोशी यांनी सांगितले की, “मी थिएटरमध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून देखील काम केले आहे. तेव्हा एक पात्र साकारल्यावर मला फक्त 50 रुपए मिळत असायचे. परंतु मी त्या गोष्टीची कधीच खंत व्यक्त केली नाही. कारण मला त्या काळात थिएटरमध्ये काम करण्याचा अनुभव मिळत होता.”

See also  "तारक मेहता..." मालिकेत दिसणार नवीन नट्टु काका, हा अभिनेता साकारणार नट्टु काकांची भूमिका...

जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला : 2020 मध्ये तब्बल तीन हजार एपिसोड पूर्ण केल्यावर तसेच या शो ने सर्वाधिक लोकप्रिय “सिटकॉम” होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. एवढंच नव्हे तर, “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो 2008 मध्ये सुरू झाला होता. ज्याची संपूर्ण कहानी ही जेठालालवर रचण्यात आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment