या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ४० वर्षानंतरही आहेत अविवाहित, 4 नंबरची अभिनेत्री तर…
तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु त्यांची सत्यता तितकीच शाश्वत आहे. बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत त्यांनी वयाच्या 35 व्या वर्षानंतरही अजून लग्न केलेलं नाही किंवा लग्नाचा विचारही डोक्यात आणलेला नाही.
त्यातही एका अभिनेत्रीची अशी खास गोष्ट म्हणजे ती चक्क बिना लग्न करता आई झालेली आहे. हिंदी सिनेमासृष्टीत अर्थात बॉलिवुडमध्ये कदाचित असा समज असावा की लग्न ही केलं पाहिजे असं काही नाही. तर विना लग्नाचही आपण आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवू शकतो.
एकीकडे पहायला गेलं तर तुम्हाला अगदी शेवटपर्यंत साथ निभावणारे कपल इथपासून ते अनेकदा डिव्होर्स झालेले, का’डी’मो’ड घेतलेले जोडपे या बॉलीवुड इंडस्ट्रीत पहायला मिळतील. आणि या अशा दोन एकमेकांच्या वि’रो’धा’भा’स गोष्टींमधे ज्या एका गोष्टीचा समावेश होते ती म्हणजे, लग्नच न करणे.
अर्थात अविवाहित राहणे. लग्न न केलेल्या एखाद्या व्यक्तीच नावं म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर चेहरा उभा राहतो तो आभिनेत्री रेखा यांचा. परंतु त्यानंतर इतर अनेक उत्कृष्ट अभिनेत्र्या आहेत ज्यांनीदेखील लग्न करणं पसंत नाही केल आणि आजतागायत त्या अविवाहित आहेत. तर आपण आता त्याच अभिनेत्रींविषयी माहिती पाहणार आहोत.
तब्बू: आपल्या वयाच्या पस्तिशीनंतरही ज्या अभिनेत्रींनी लग्न केलं नाही त्यामध्ये सामील असलेलं नाव म्हणजे तब्बू. ती आज 47 वर्षांची आहे परंतु तिने अद्याप विवाह केला नाही. काही काळापूर्वी तिचं आणि अजय देवगन या दोघांचा अफेअर प्रचंड गाजलं होतं. परंतु अजय देवगनचं काजोल सोबत लग्न झालं. त्यामुळे कदाचित तब्बू आजही अविवाहित राहिली आहे.
शिल्पा शिंदे: यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे भाभी जी घर पर है या मालिकेतील शिल्पा शिंदे. शिल्पा शिंदे आज तब्बल चाळीस वर्षाची असूनही अविवाहित राहिली आहे. शिल्पा शिंदे सांगते ती एकटीच तिच्या आयुष्यात सुखी आहे, आणि तिला एकटचं राहणं पसंत आहे.
नर्गीस फाखरी: रॉकस्टारसारखा सिनेमा आणि त्यानंतरही बरेच दर्जेदार हिंदी सिनेमे केलेली नर्गीस फाखरी ही अभिनेत्री देखील वयाच्या 38 व्या वर्षी अविवाहितच आहे. काही काळापूर्वी तिचं नावदेखील उदय चोप्रा या अभिनेत्यासोबत जोडल्या गेलं होतं.
अमिषा पटेल: “कहो ना प्यार है”, “गदर” यांसारखे सुपर डुपर हिट सिनेमे दिलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. आज वयाच्या 42 व्या वर्षीही एकटीच राहिलेली आहे, तिने अजूनही लग्नाचा विचार केलेला नाही.
शमिता शेट्टी: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता शेट्टी जिचा नुकताच वाढदिवस साजरा झाला तीदेखील अजूनही अविवाहितच आहे.
मौनी रॉय: गेल्या काही दिवसांपुर्वीच मौनी रॉय या अभिनेत्रीच्या अफेयर्स बाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं, परंतु अजूनही या बाबतची कुठलीही शाश्वत खबर समोर आलेली नसल्याने तिदेखील वयाच्या 35 व्या वर्षानंतरही अविवाहित आहे असचं म्हणावं लागेल.
सुष्मिता सेन: एके काळी आपल्या अदकारिने साऱ्या भारत देशाचं लक्ष स्वत:कडे ओढवून घेतलेली अभिनेत्री म्हणजे, मिस युनिव्हर्स ठरलेली सुष्मिता सेन. तिची आजवरची बाॅलीवुड कारकिर्द अगदी चांगल्याच उंचीची, यशाच्या शिखराची राहिली आहे. परंतु आज तब्बल वयाच्या 45 व्या वर्षीही ती विना लग्नाची राहते आहे.
साक्षी तंवर: “बडे अच्छे लगते है”, “कहानी घर घर की” यांसारख्या मालिकांमधून शिवाय “दंगल” सिनेमात काम केलेली साक्षी तंवर ही लाखोंच्या ह्रदयावर आपल्या साजूक अदाकारीने राज्य करणारी अभिनेत्रीदेखील आजच्या घडीला वयाच्या 45 व्या वर्षातही अविवाहित राहिली आहे. परंतु साक्षी आज एका मुलीची आई आहे. साक्षीने एका मुलीला ॲडाॅप्ट केलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार लग्न करणं तिला तितकं महत्वाच अथवा गरजेच वाटतं नाही.
मल्लिका शेरावत: बाॅलीवुडला एके काळी आपल्या बो’ल्डनेसने वेड लावणारी अभिनेत्री अर्थात मल्लिका शेरावत. आज तिचं वय 44 पेक्षा अधिक असूनही तिने लग्न केलेलं नाही.
तनिषा मुखर्जी: यानंतर बोलायचं म्हणजे तनिषा मुखर्जी. वयाच्या 42 व्या वर्षीही ती एकटीच आहे. तिने मोठ्या पडद्यावर फार काही जादू केली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!