कोट्यावधींची मालमत्ता असूनही हे बॉलिवूड कलाकार राहतात चक्क भाड्याच्या घरात, 3 नंबरची अभिनेत्री तर…
चंदेरी दुनियेतील स्टार्स हे दीर्घश्रीमंत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आलिशान घर व भरपूर प्रॉपर्टी असते, हे तर आपल्याला माहित आहे. परंतु ते म्हणतात ना, दिसते तसे मुळीच नसते बरं का… कारण आज आम्ही तुम्हांला अशा काही स्टार्स विषयी सांगणार आहोत, जे आजदेखील मुंबईत भाड्याच्या घरामध्ये राहतात.
1) जॅकलीन फर्नांडिस: श्रीलंकेची ब्युटी क्वीन आणि माजी मिस युनिव्हर्स श्रीलंका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही हल्ली सी फेस येथील पाच बेङरूमच्या अपार्टमेंट राहत आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, जॅकलीन दरमहिना 6. 78 लाख भाङे आपल्या घरासाठी देत आहे.
2) ऋतिक रोशन: बॉलीवुड इंडस्ट्रीचा ग्रीक गॉङ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन याने आतापर्यंत अनेक भूसंपत्ती प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच त्याने जुहू मध्ये भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहण्याचे ठरवले आहे.
ही अपार्टमेंट अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या बंगल्याच्या खूप जवळ आहे. तेथे साधारण एक वर्षापासून तो राहत आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार हृतिक हा दरमहिना 8. 25 लाख घरभाडे देत आहे.
3) परिणीती: अभिनेत्री परिणीती हिने आपल्या बॉलीवुड करियरची सुरुवात “लेडीज वर्सेस रिकी बहल” या चित्रपटातून केली होती. तुम्हांला ठाऊक आहे का, परिणीती ही अजूनही आपल्या स्वप्नातील घर शोधते. पण तिला शोधण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे ती अजूनही मुंबईतील दोन बेङरूमच्या अपार्टमेंट मध्ये भाडेकरू आहे.
4) कतरिना कैफ: अभिनेत्री कतरिना कैफ हिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या दिवसापासून पाऊल ठेवले, त्या दिवसापासून तिच्याकडे घर नाही. कार्टर रोडवरील सिल्व्हर सँङस अपार्टमेंटमध्ये राहण्यापासून वांद्रे येथे भाड्याने घेतलेल्या पेंटहाऊस पर्यंत कतरिना कैफ राहते. ती दरमहिना 15 लाख रुपये भाडे देते.
5) विद्युत जामवाल: साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवालने 2012 साली “फोर्स” या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये एन्ट्री केली. त्याला बॉलीवुडचा नवीन “एक्शन हिरो” म्हणून ओळखले जाते. विद्युत जामवाल यांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवायचे नाहीत. म्हणून ते देखील सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.