फक्त कोरोनावर लक्ष केंद्रीत करण्याच्या नादात ‘या’ घातक रोगांकडे दुर्लक्ष न करण्याचे तज्ञांचे आवाहन, ठरू शकतात अतिशय धोकादायक

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही थांबली नसून, देशातील काही राज्यात रोज हजारो नवीन रुग्ण आढळत आहेत. तसेच केंद्र तसेच अनेक राजी सरकार कोरोनाची संभावित तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व शक्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत.

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून देसगत डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. एकट्या दिल्लीमध्ये जानेवारी ते मे दरम्यान मोठ्या प्रमाणात डेंगूचे रुग्ण आढळले आहेत. ही संख्या मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.

कोरोनाच्या संभावित तिसर्‍या लाटे दरम्यान आणि दुसर्‍या लाटेत समोर येत असलेले डेंगू, मलेरिया आणि चिकन गुनिया सारखे संसर्गजन्य आजार समस्या निर्माण करू शकतात. या व्यतिरिक्त, विषाणूजन्य ताप आणि साध्या तापाची प्रकरणे सतत समोर येत असतात; तथापि, प्रशासन आणि सामान्य लोकांनी त्यांच्या पातळीवर वेक्टर बोर्न रोगांबाबत (vector Borne Diseases) खबरदारी घेतल्यास परिस्थिती बर्‍याच प्रमाणात ठीक राहू शकते. असे तज्ञांचे मत आहे.

See also  या वृध्दाश्रमाने घेतले लहान अनाथ मुलांना दत्तक, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल!

एनसीडीसी चे संचालक डॉ. सुजीत सिंग यांनी सांगितले की, या वर्षी दिल्ली  मध्ये मागील 3 वर्षाच्या तुलनेत डेंगूचे जास्त रुग्ण आढळले आहेत. सरकारने फक्त कोरोनावरच लक्ष न देता इतर आजारावरही लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. देशात यावर्षी जास्त पाऊस होत असून, त्यामुळे डासांची संख्या वाढण्याचची शक्यताही जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व पालिकांनी तत्काल उपाययोजना कराव्यात.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment