या सेलीब्रेटींकडे आहेत कोट्यावधींच्या “राॅल्स रॉयस” गाड्या, अजय देवगणच्या राॅल्स रॉयसची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बाॅलीवुडमधील सेलिब्रेटींचा थाट अनेकदा जुन्या काळातल्या राजेशाही थाटाप्रमाणेच आपल्याला पहायला मिळतो. आपण शक्यतो त्यांच्या अशा आयुष्यातील लाइफस्टाइलला लग्जरी लाइफस्टाइल म्हणून संबोधित करत असतो. सेलीब्रेटींमधे एकतर बाॅलीवुड स्टार असतो किंवा क्रिकेट स्टार नेहमी त्यांची एक नजर ही महागड्या आणि आलिशान गाडीकडे असतेच.

आणि मुळात एखादा असा सेलीब्रेटी ज्याला गाड्यांवर अफाट प्रेम आहे तो त्यांचा अगदी घाटच घालतो. म्हणजे तो पाच ते सहा किंवा कधीकधी दहा एकत्र गाड्यांचा आपल्या ताफ्यात संचय करून ठेवतो. सध्या अशात लग्जरी आणि राजेशाही थाट असणाऱ्या ज्या गाडीचा उल्लेख जगभरात केला जातो, ती गाडी म्हणजे “रॉल्स रॉयस”.

या गाडीच्या अनेक विविध लग्जरी खासियत आहेत. ही गाडी मुळातच तिच्या क्वालिटीसाठीदेखील अनेकांची पहिली पसंती राहिली आहे. तर आज आपण इथे याच कंपनीच्या गाड्या थेट कोणकोणत्या सेलीब्रेटींनी खरेदी केल्या आहेत हे पाहणार आहोत. सर्वात प्रथम सांगायच झालं तर बाॅलीवुडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार.

See also  या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!

Akshay%20Kumar%20(2)

अक्षय कुमार बाॅलीवुडमधील गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. आणि मुळात एवढा पैसा मिळवल्यावर साहजिकचं तो स्वत:चा छंद, आवड जोपासू शकतो. अक्षय कुमार या अभिनेत्याने थेट 7 व्या जनरेशनची “फैंटम – 7” हे रॉल्स रॉयस या कंपनीचं माॅडेल स्वत:कडे खरेदी केलेलं आहे. या गाडीची मार्केटमधील किंमत थेट साडेनऊ कोटींपासून ते 11 कोटींपर्यंत आहे.

यानंतर सध्या ज्याच्या पठाण या चित्रपटाच्या अनेक बातम्या सर्वत्र पसरत आहेत, आणि जो बाॅलीवुडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध आहे तो शाहरूख खान. बाॅलीवुडच्या सिनेसृष्टीत आजवरचा सर्वाधिक श्रीमंत हा अभिनेता आहे. शाहरुखला गाड्यांवर प्रेम निश्चितच आहे.

shahrukh khan car collection rolls royce

परंतु तो गाड्यांवर थोडसं अधिक काळजीवालं प्रेम करतो असं म्हणावं लागेल. “फैंटम ड्रॉपहेड कूप” हे रॉल्स रॉयस या कंपनीचं मॉडेल शाहरूख खान याच्याकडे आहे. या गाडीची खासीयत म्हणालं तर ही एक कन्व्हर्टेबल सिस्टमची गाडी आहे. यानंतर अशा लग्जरी गाड्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर येतो तो अभिनेता म्हणजे, अजय देवगण.

See also  अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबावर आहे करोडोंचे कर्ज, एकट्या सनी देओलवर आहे एवढ्या कोटींचे कर्ज...

Ajay Devgn Roll Royce 01

अजय देवगण अभिनेता म्हणूनचं नाही तर त्याच्या इतर बर्‍याच खास गोष्टींमुळेही तो प्रसिद्ध आहे. अजयकडे तब्बल 84 कोटींच प्रायव्हेट जेटसुद्धा आहे. अजयकडे सध्या जवळपास 6 कोटींची “रॉल्स रॉयस कनीनन” ही गाडी आहे. याच गाडीवर अजयला अत्यंत प्रेम आहे. 2019 सालीच अजयने या गाडीला खरेदी केलं आहे. आता बोलायचं झालं तर ते म्हणजे, अभिनेता ऋतिक रोशन. सर्वांनाच आजवर ऋतिकच्या बाॅडी, लुक्स, त्याच्या डान्सकलेच्या स्टेप्स या सर्वांबाबत माहिती आहेच. आणि याव्यतिरिक्त ऋतिकला गाड्यांच कलेक्शन करायला आवडतं.

Rolls Royce Ghost Series II Hrithik Roshan

त्याच्याकडे जवळपास एक डझनभर गाड्या आहेत. तरीदेखील आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्याने स्वत:ला थेट “रॉल्स रॉयस घोस्ट सिरिज – 2” ही गाडी भेट दिली. या गाडीची किंमत 7 कोटींच्या घरात आहे. ऋतिकने गाडी खरेदी केल्यानंतर या गाडीत स्वत: काही माॅडीफिकेशन केले होते, ज्यामुळे तब्बल 1 कोटी अधिक पैशांनी ही गाडी महाग पडली.

See also  खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत हे टीव्ही कलाकार, या अभिनेत्रीने तर...

60647648

यानंतर येतो तो अभिनेता म्हणजे संजय दत्त. 2010 साली संजय दत्तने त्याची बायको मान्यताला “रॉल्स रॉयस घोस्ट” ही तब्बल 7 ते 8 कोटींच्या किमतीच्या घरातली गाडी गिफ्ट केली होती. सध्या बाॅलीवुडमधून हाॅलीवुडसिनेमात स्थायिक होणारी प्रियंका चोप्रा हिच्याकडेदेखील “रॉल्स रॉयस घोस्ट” हेच मॉडेल खरेदी केलेलं आहे. यानंतर बाॅलीवुडचा सध्याचा टॉप रॅपर अर्थात बादशाह. बादशहाने रॉल्स रॉयस व्रेथ ही गाडी तब्बल 6.4 कोटी रूपयांना घेतली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment