खऱ्या आयुष्यात देखील पती-पत्नी आहेत हे टीव्ही कलाकार, या अभिनेत्रीने तर…

टीव्ही कलाकार सामान्यत: सेटवर एकमेकांसोबत ८ ते १० तास वेळ घालवतात. अशा परिस्थितीत ते सेटवर काम करणाऱ्या इतर कलाकारांशी त्यांची चांगली बॉन्डिंग निर्माण होते.

आणि साहजिकच आहे कि काही कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकमेकां सोबत लग्नाच्या बंधनात देखील अडकतात. त्यामुळे आज आम्ही अशाच जोडप्यांविषयी सांगणार आहोत जे टीव्हीचे मोठे स्टार आहेत आणि खऱ्या जीवनात देखील पती पत्नी आहेत.

gurmeet

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी ‘रामायण’ चित्रपटाद्वारे रातोरात प्रसिद्धी मिळविली. या दोघांनी या मालिकेत राम आणि सीता यांच्या भूमिका साकारल्या होत्या. देबिना एका टॅलेंट हंटच्या माध्यमातून मुंबईत आली होती. सीरियलमध्ये काम करण्यापूर्वी ती गुरमीतला ओळखत होती. खरं तर, देबिनाच्या एका मित्राने तिला गुरमीतसोबत ओळख करून दिली होती. २०११ मध्ये दोघांचे लग्न झाले होते.

694633 bhari harsh

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ही टीव्हीची जोडी खूपच सुप्रसिद्ध आहे. पूर्वी हर्ष कॉमेडी शोसाठी स्क्रिप्ट लिहायचा आणि नंतर त्याने शो होस्ट करायला सुरवात केली. बर्‍याच दिवसांपासून भारतीशी डेटिंग केल्यानंतर हर्ष लिंबाचियाने 2017 मध्ये भारतीशी सोबत लग्न केले.

mahhi 1 770

जय भानुशालीने 2011 मध्ये त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या माही विजसोबत लग्न केले. लग्नाच्या काही काळाआधीच दोघांचे प्रेम संबंध होते. माही आणि जय हे दोघेही टीव्ही जगातील प्रसिद्ध कलाकार आहेत.

Hiten Tejwani Gauri Praadhan 0

टीव्हीच्या पहिली रीलमधून रियल लाईफ जोडी हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान यांना म्हणता येईल. या नात्याची सुरुवात ‘कुटुंब’ या मालिकेतून झाली. यानंतर या दोघांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये काम केले. हितेनला गौरी आवडली पण गौरी सेटवर कोणाशीही जास्त बोलत नव्हती. कदाचित यामुळेच हितेनला गौरी जास्त आवडायला लागली होती. 2004 मध्ये या दोघांचे लग्न झाले.

article l 2019925915405756457000

सनाया इराणी आणि मोहित सहगल यांना त्यांचे चाहते ‘मोनाया’ या नावाने बोलवतात. या दोघांचे 2016 साली लग्न झाले होते. ‘मिले जब हम तुम’ या मालिकेत सनाया आणि मोहित यांची भेट झाली होती. जिथे दोघेही रोमँटिक भूमिकेत होते. त्यांचा ऑन-स्क्रीन रोमान्स खऱ्या देखील आयुष्यात बदलला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment