बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई:  आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मात्र सभागृहात केलेल्या गैरवर्तनामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे भाजपने सभात्याग करत आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस म्हणाले की, “सत्ताधार्‍यांनी खोटी आणि बनावट कथा रचून आमच्या 12 आमदारांना निलंबित केले आहे. आम्ही सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावर उघडे पाडत आहोत आणि हे सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे आमची मुस्कटदाबी करण्यासाठी आमच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित केले आहे. आम्हाला याची शंका होतीच आणि ती शंका आता खरी ठरत आहे.“

See also  देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे ही घटना, ‘या’ गुन्ह्यासाठी महिला खासदाराला मिळाली 6 महिन्याचा कारावासाची सजा

सर्व आमदार निलंबित केले तरी लढत राहू

फडणवीस पुढे म्हणाले, “ओबीसी आरक्षणासाठी 12 काय पूर्ण 105 आमदार निलंबित केले तरी आम्ही लढत राहू. जोपर्यंत ओबीसी आरक्षण परत येत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष करतच राहणार आहे. यापूर्वीसुद्धा अनेकवेळा  सभागृहात गोंधळ झालं आहे. नेहमीच दालनात राडा होत असतो पण कधीच कोणाचे निलंबन होत नाही.”

विरोधीपक्षाचे संख्याबळ करण्याचा सरकारचा प्रयत्न

“शिवसेना आमदारांनी धक्का-बुक्की सुरू केली, तेव्हा आमचे काही आमदार संतापले होते. पण आम्ही त्यांना रोखलं आणि बाजूला केलं. जी काही धक्का-बुक्की झाली त्यासंदर्भात आशिष शेलार यांनी सर्वांच्या वतीने भास्कर जाधव यांची क्षमा मागितली. जाधव आणि आशिष शेलार यांची गळाभेट सुद्धा झाली. हा विषय आम्ही तिथेच संपवून बाहेर आलो होतो. मात्र, शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी आमच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी बनावट कथा रचली. आमचे संख्याबळ कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.” असंही फडणवीस म्हणाले.

See also  फिल्मी स्टाईल नाटक करून, गंभीर गुन्ह्यातील 4 आरोपी माढा जेलमधून पळाले, जाणून घ्या कशी घडली घटना?
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment