घरातील उत्तर-पश्चिम दिशेला शौचालय बांधताना या गोष्टींची काळजी अवश्य घ्या, नाहीतर…
मंडळी आपण सर्वांनी याआधी अनेक लग्नांना हजेरी नक्कीच लावली असेल. लग्न म्हटलं की लग्नाची तयारी आली आणि यातच सर्वप्रथम आपण जे काम करतो ते म्हणजे आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका तयार करतो. अशीच एक लग्न पत्रिका यूपीमध्ये देखील तयार केली परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या लग्नपत्रिकेवर लिहिलेल्या सामाजिक संदेशामुळे ती पत्रिका बातम्यांमध्ये झळकत आहे. असं काय लिहिलेलं आहे त्यामुळे ही पत्रिका एवढे प्रसिद्ध झाली आहे जाणून घेऊयात….
आज-काल लग्न लक्षात राहावं म्हणून काय प्रकार केले जात नाहीत मोठ्याने गाणे लावली जातात, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो मग त्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग असो किंवा लग्नासाठी महागडे डिझायनर कपडे वापरण असो. परंतु या महाशयांनी केवळ एका वाक्यामध्ये एक सामाजिक संदेश देत संपूर्ण देशाला एक नवीन आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला आहे. एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत आपल्या सर्व मित्रमंडळींना, नातेवाईकांना आमंत्रित करताना ” लग्नामध्ये दारू पिणे मना आहे ” असा सामाजिक संदेश लिहिलेला आहे.
उत्तर प्रदेशातील, कन्नौज जिल्ह्यातील अवधेश चन्द्र यांनी तयार केलेली ही लग्नपत्रिका सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यांनी या पत्रिकेबद्दल बोलताना सांगितलं की,” अशा समारंभात दारू पिल्यामुळे अनेक लोक आपली मर्यादा विसरून जातात आणि त्यामुळे कार्यक्रमा मध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे मी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे.”
अवधेश चंद्र त्यांच्या या निर्णयाची सगळीकडे प्रशंसा होत आहे. आणि असं देखील बोलले जात आहे की प्रत्येक लग्नात अशा प्रकारचे काळजी घेतली तर व्यसनाधिनतेवर नक्कीच अंकुश ठेवला जाऊ शकतो. इतर ठिकाणी मात्र लोक स्वतःहूनच दारू आणि इतर गोष्टींची व्यवस्था करतात त्यामुळे एका अनिष्ठ परंपरेला आपण खतपाणी घालत आहोत याची जाणीव आपल्या सर्वांना असायला हवी. अशा परिस्थितीत अवधेश चंद्र त्यांनी घेतलेले हे पाऊल खरंच समाजहिताचे आहे.