“या” अभिनेत्याला होते से’क्सचे व्यसन, स्वतःच्या तोंडानेच उघड केले त्याने हे 4 वर्षांपूर्वीचे सत्य…
“स्पायडरमॅन” या चित्रपटातून संपूर्ण जगात लोकप्रिय झालेला हॉलीवूड अभिनेता जेम्स फ्रँको हा सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्यावर से’क्शुअल हरासमेंटचे आ’रोप झाल्यावर आता तब्बल ४ वर्षानंतर त्याने मौन तोडले आहे. यावर त्याने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला असून याविषयी बोलताना आपण से’क्स ऍडिक्शनचा सामना करत असल्याचे त्याने सांगितले आहे. तो स्वतःच्या एक्टिंग स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवत असे. परंतु मागील काही वर्षांपासून तो आता सुधारण्याचे काम करत आहे.
जेम्स फ्रँकोने आपल्या एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले की, तो विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचा. जे की फार चुकीचे होते. त्या अभिनेत्याने असे देखील सांगितले की, त्याच्या से’क्स एडिशनमुळे त्याने स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी एक्टिंग स्कूल सुरु केले नाही. तो म्हणाला की, “तेव्हा माझा विचार असा होता की सहमती झाले तर ठीक आहे.”
साधारण ४ वर्षांपूर्वी जेम्स फ्रँकोवर से’क्शुअल ह’रासमेंटचे आ’रोप झाले होते. तर आता एवढ्या वर्षांत त्याने या प्रकाणाविषयी आपले मौन तो’डले असून डिटेल्समध्ये सर्व सांगितले आहे. मीडिया माहितीनुसार पाच महिलांनी फ्रँकोवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये दोन महिलांनी जेम्सविरोधात खटला दाखल केला. कारण त्याने अभिनेता बनण्यासाठी आलेल्या एक्टिंग स्कूलमध्ये आलेल्यांचे शोषण केल्याचा आरोप तसेच तरुणींना से’क्स सीन शूट करायला लावल्याचा आरोप केला होता.
फ्रँकोने सांगितले की, खूप लहान वयातच त्याला दारूचे व्यसन होते, तो म्हणाला की, “हे अतिशय पॉवरफुल ड्रग आहे.” २०१६ पासून तो से’क्सच्या व्यसनातून सावरत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर झालेल्या आरोपांनंतर तो यावर खूप काम करत होता. तसेच स्वतःला पूर्णपणे बदलू पाहत होता. तसेच तो म्हणाला की,”मला लोकांना अजिबात दुखवायचे नाही. एक अभिनेता असण्यासोबतच जेम्स एक चित्रपट निर्माता आणि लेखक देखील आहे. स्पायडरमॅन ट्रायोलॉजी, मिल्क, राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स यांसह अनेक हिट चित्रपटांमध्ये तो त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.