“तारक मेहता…” मालिकेत दिसणार नवीन नट्टु काका, हा अभिनेता साकारणार नट्टु काकांची भूमिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. मागील 13 वर्षांपासून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे घर निर्माण केले आहे. परंतु काही दिवसांपासून आपल्याला नट्टु काका या मालिकेत दिसत नाहीत. मात्र आता लवकरच नट्टु काका पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील.

कारण काही दिवसांपूर्वीच नट्टु काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे बरेच दिवस नट्टु काका आपल्याला शो मध्ये दिसले नाहीत. म्हणून पुन्हा नट्टु काकांची भूमिका कोण बरं साकारणार? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला आहे. तसेच दुसरीकडे सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर नट्टु काका यांच्या भूमिकेसाठी एका नवीन कलाकाराला निर्मात्यांनी घेतले असल्याचे म्हटले जात आहे.

See also  "तारक मेहता..." मध्ये झाली नवीन पात्राची एंट्री, दयाबेन कि बबिताजींची भूमिका साकारणार ही अभिनेत्री?

सोशल मीडियावर सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो चे अपडेट्स देणाऱ्या एका फॅनपेजने काही दिवसांपूर्वीच नट्टु काकांचा फोटो शेयर केला आहे. जेठालाल च्या दुकानात बसलेला हा नवा कलाकार कोण आहे, हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. नट्टु काकांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते घनश्याम पाहिले, तेव्हा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाला. 2008 साली ही मालिका प्रदर्शित झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेत नवीन नट्टु काकांची भूमिका साकारण्यासाठी नवीन कलाकार सज्ज आहेत. परंतु त्यांची भूमिका कितपत प्रेक्षकांना आवडते, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सगळ्यांच्या मुलांना अ'टक झाली पाहिजे" असे म्हणत मीका सिंह प्रचंड भडकला.
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment