“माझं घर माझा संसार” चित्रपटातील या अभिनेत्रीला झाला होता हा घातक आजार, वयाच्या 31 व्या वर्षीच घेतला तिने जगाचा निरोप
मित्रांनो आपल्या मराठी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेले, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाने चाहत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. आज ते चेहरे या जगात जरी नसले, तरी देखील त्यांची आठवण आल्याशिवाय काही राहत नाही. त्याचप्रमाणे कुठेतरी, कधीतरी त्यांची कमी ही नक्कीच जाणवते. अशीच एक मोहक सौंदर्याची अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनावर जादू केली.
“दृष्ट लागण्या जोगे सारे” हे गाणे आजही आपल्या ओठांवर येते. या गाण्याचे बोल आठवले की नजरेसमोर चेहरा येतो, तो अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिचा… “माझं घर माझा संसार” हा चित्रपट 1986 साली प्रदर्शित झाला. ट्रेनमध्ये प्रवास करताना एकमेकांच्या ङोळयांत आपल्या नव्या संसाराची स्वप्नं पाहणारे ते जोडपे.. या सर्व गोष्टी अगदी सहजपणे आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.
“माझं घर माझा संसार” या चित्रपटात अभिनेता अजिंक्य देव सोबत मुग्धा ने मुख्य भूमिका साकारली होती. अनुराधा पौङवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली ही गाणी आजही सर्वांच्या मनावर ताबा मिळवतात. या चित्रपटात अजिंक्य देव च्या आईची भूमिका दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी साकारली होती. सासू आणि सूनेची ही जोडी चांगलीच खुलून दिसत होती. त्याचप्रमाणे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुग्धा चिटणीस हिने अभिनेत्री म्हणून भूमिका साकारलेला एकमेव उत्कृष्ट चित्रपट आहे.
मनाला आजही खंत वाटते की, गोंडस सौंदर्याच्या या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला. 5 ङिसेंबर 1994 साली तिला कँ’सर असल्याचे समजले. लहानशा वयात या मोठ्या आ’जाराची झुंज देताना 10 एप्रिल 1996 मध्ये तिचे निधन झाले. मीडिया रिपोर्टस् नुसार मुग्धा चिटणीस ही फक्त एक अभिनेत्री नव्हती. तर ती एक उत्कृष्ट कथाकथनकार सुद्धा होती. भारत आणि अमेरिका येथे तिने कथाकथन शैलीत तब्बल 500 कार्यक्रम सादर केले. तसेच मुंबईतील “ऑल इंडिया रेडिओ” मध्ये सुद्धा तिने बरेचसे कार्यक्रम सादर केले आहेत.
18 फेब्रुवारी 1965 रोजी मुग्धा चा जन्म झाला होता. तिने उमेश घोडके यांच्यासोबत लग्न केले होते. मुग्धा चा कँ’सर ने जेव्हा मृ’त्यु झाला, तेव्हा तिची मूलगी फक्त 5 वर्षांची होती. आपल्या आईचे निधन झाल्यावर छोटी ईशा आपले आजी-आजोबा अशोक आणि शुभा चिटणीस यांच्यासोबत मुंबईत राहू लागली. उमेश घोडके यांनी ईशाला आईचे व वडिलांचे असे दोघांचेही प्रेम दिले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत पाठवले. ईशाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मधून जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी मिळवली. तुम्हांला ठाऊक आहे का, ईशा ही हुबेहुब आपल्या आई सारखीच दिसते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.