“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील या कलाकाराला आली चक्क बिग बॉस 15 ची ऑफर, कोण आहे तो कलाकार?
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. या शो मधील प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या मालिकेतील हे कलाकार सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, आता या शो मधील एका कलाकाराला चक्क बिग बॉसची ऑफर आली आहे.
परंतु तो कलाकार कोण आहे, त्याने ही ऑफर स्वीकारली का नाकारली, खरंच तो कलाकार आपल्याला बिग बॉस हाऊसमध्ये दिसणार का? असे कित्येक प्रश्न तुम्हांला देखील पडले असतीलच. चला तर मग जाणून घेऊया, तारक मेहता का उल्टा चश्मा मधील नक्की कोणत्या कलाकाराला ही ऑफर मिळाली आहे.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील रोशन सिंह सोढी ही भूमिका अभिनेते गुरूचरण सिंह यांनी साकारली होती. परंतु एका खाजगी कारणामुळे मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी “बिग बॉस 15” आणि “बिग बॉस ओटीटी” ची ऑफर आपल्याला आल्याचा खुलासा केला होता. मात्र गुरूचरण यांनी त्या दोन्ही ऑफर्स नाकारल्याचे सांगितले.
गुरूचरण यांनी नुकतीच मीडियाला मुलाखत दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, माझी निर्मात्यांसोबत फिल्म सीटीमध्ये मीटिंग होणार होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. आजपर्यंत ती मीटिंग झालेली नाही. याचे कारण फक्त चॅनेललाच माहित आहे. निर्मात्यांनी मला सांगितले होते की, मी बिग बॉसचा हिस्सा व्हावा, अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे. मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा मी त्यांना हो म्हटले होते, असे गुरूचरण यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”आम्ही भेटणार होतो. पण त्यावेळी त्यांना वेळ नव्हता. म्हणून ते नंतर भेटू असे म्हणाले. परंतु मी त्यांना परत जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही. मला माहित नाही, मी खरंच बिग बॉस मध्ये सहभागी व्हावे, असे त्यांना वाटत होते की नव्हते. पण मला त्यांनी बिग बॉस ओटीटी ची सुद्धा ऑफर दिली होती. तेव्हा त्यांनी मला क्वारंटाईन होण्यास सांगितले होते आणि मी तयार सुद्धा झालो होतो. परंतु नंतर मात्र ते काहीच म्हणाले नाहीत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.