“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील या कलाकाराने अचानक सोडली मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठी वाहिनीवर नुकतीच काही दिवसांपूर्वी सुरू झालेली मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” ही दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात आपले घर करत आहे. यामधील छोट्याशा क्यूट परीचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावले. त्याचबरोबर प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्या पुनरागमनाने ही मालिका दिवसेंदिवस अतिशय लोकप्रिय होत आहे. हेच खरं तर या मालिकेचे यश आहे, असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही.

संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, मानसी मागीकर, अजित केळकर यांसारखे दमदार अभिनयाला अवगत असलेले कलाकार मिळाले. परंतु “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतील समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आता आपल्याला या मालिकेत दिसणार नाही. ही खरंतर मनाला उदास करणारी गोष्ट आहे.

See also  देवमाणूस मालिकेतील ही फॉरेनर नक्की आहे तरी कोण? याआधी तिने केलं होतं इथे काम जाणून घ्या.

अर्थातच मित्रांनो तुम्ही देखील हे ऐकून टेन्शन मध्ये आले असाल. संकर्षण कऱ्हाडे ही मालिका का बरं सोडत आहे, हा विचार त्याचा चाहतावर्ग सध्या करत आहे. मात्र त्यामागे देखील एक विशेष कारण आहे. ते म्हणजे नुकतेच आपल्या महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील सर्व निर्बंध हटविल्याने नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत देखील याची उत्सुकता पाहायला मिळते. याच महत्त्वपूर्ण कारणामुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा आता “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत काही काळ आपल्याला दिसणार नाही.

संकर्षण कऱ्हाडे याने अभिनय केलेले “तू म्हणशील तसं…” हे नाटक लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सरकारच्या निर्बंधांमुळे हे नाटक पुन्हा एकदा कलाप्रेमींच्या मनोरंजनासाठी येत आहे. 23 ऑक्टोंबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे आणि 24 ऑक्टोंबर रोजी काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे संकर्षण कऱ्हाडे हा आपल्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त राहणार असल्याने तो “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेसाठी वेळ देऊ शकत नाही.

See also  आई कुठे काय करते: अरुंधती व ईशा मध्ये चांगलेच जुंपले, यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

“तू म्हणशील तसं..” या नाटकात संकर्षण कऱ्हाडे सोबत अभिनेत्री भक्ती देसाई ही प्रमुख भूमिकेत दिसेल. या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांच्या गौरी थिएटर च्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच या नाटकाचे लेखन स्वतः संकर्षण कऱ्हाडे ने केले आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद ओक यांनी सांभाळली असल्याने हे नाटक अतिशय लोकप्रिय होणार, हे तर नक्कीच.. संकर्षण कऱ्हाडे व भक्ती देसाई यांनी नाटकासाठी काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला असून थोड्याफार प्रमाणात ते मालिकेत दिसतील आणि लवकरच “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेत पुन्हा परततील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "देवमाणूस" मधील 'वंदी आत्या' पाहा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटोज् पाहून तर विश्वासच बसणार नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment