अनिल देशमुख शरद पवारांचे व अनिल परब उद्धव ठाकरेंचे वसूली एजेंट, ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: 100 कोटी वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने त्यांची तब्बल 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करत किरीट सोमय्या म्हणाले की, ईडी ने अनिल देशमुख यांची 2010 ची मालमत्ता शोधून काढली. लवकरच त्यांना 2020 आणि 2021 ची मालमत्ता सापडेल, असा टोला त्यांनी लगावला.

See also  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ सल्लागारावर आयकर विभागाची नजर, होऊ शकते कारवाई; समोर आले धक्कादायक कारण

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप…

अनिल देशमुख यांनी वसूल केलेला काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करेल आणि सगळं समोर येईल. असंही ते म्हणाले. सचिन वाझे बादल बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, वाझे सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. मग परमबबीर सिंह , अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा. किरीट सोमय्या एवढ्यावरच न थांबता, अनिल देशमुख हे शरद पवार यांचे वसूली एजेंट आहेत, तर अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वसूली एजेंट आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.

दोघेही एक दिवस तुरुंगात जाणार…

See also  भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल, म्हणाल्या तुम्ही ड्रायविंग...

अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही एकदिवस नक्कीच तुरुंगात जाणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. सध्या अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले असून, अटकेपासून वाचण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करतील. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिल्यावर त्यांना ईडीकडेच यावे लागेल, असं ते म्हणाले.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment