रोजाने काम करणारं दांपत्य आज कमवतात ५० लाख रुपये, दोन गायींच्या पालनापासून सुरु झालेला प्रवास आज तब्बल ५० गायींच्या व्यवसायापर्यंत येऊन पोहचला आहे
.
जीवन जगायचं म्हणल्यावर हातपाय हलवावे लागतात. कष्ट करावे लागतात. येणाऱ्या संकटाना तोंड देऊन लढावं लागतं. आज अनेक जण असेच लढत आहेत. चांगलं वाईट याच्या पलीकडे काम करत आहेत.
त्यात कुणाला नोकर व्हायला आवडतं तर कुणाला मालक. त्यात मालक होणार्यांची संख्या खूप जास्त आहे. जगात कितीतरी लोक असे आहेत की आपल्याला त्यांच्याकडून कामाच्या यशाची प्रेरणा मिळु शकते. त्यांनी त्यांचं काम प्रामाणिक पणे करत आज यश गाठलं आहे.
त्यात कामाची कसलीच लाज ते बाळगत नाहीत. डॉक्टर च्या मुलाला वाटतं डॉक्टर व्हावं पण शेतकऱ्याच्या मुलाला मात्र डॉक्टर होऊ वाटतं पण शेतकरी नाही किंवा काही व्यवसाय नाही. आज सगळीकडे अशी परिस्थती असताना सुद्धा एक नवरा बायकोचं जोडपं असं आहे की त्यांच्या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं आहे. आज सगळ्यांनी त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घेण्यासारखं आहे. चला तर मग पाहूयात की ते जोडपं म्हणजे नेमकं कोण ?
सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कुसमोड गावातलं हे दांपत्य आहे. ज्यांचा व्यवसाय आज खूप चालत आहे. संतोष गोरे आणि त्यांची पत्नी या दोघांनी काही वर्षांपूर्वी मिळून गायपालन आणि दूधधंदा चालू केला होता. तेव्हा त्यांनी दोन गाईने सुरुवात केली होती. पण कष्ट केले की फळ मिळतं या उक्तीप्रमाणे आज त्यांच्याकडे तब्बल पन्नास गायी आहेत. बघा म्हणजे एका गायी पासून सुरु होणारा व्यवसाय पन्नास गायीपर्यंत येऊन पोचतो.
ही खूप अभिमानाची प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यात त्यांनी खूप संकटाना तोंड दिलं. पण हारले नाहीत. मिळून दोघांनी एकजुटीने वाट शोधली आणि प्रवास सुरु ठेवला. तेही अविरत पणे.
विशेष म्हणजे इथं काम करण्यासाठी कुठलाही कामगार नाही. आज आपण पाहतो की थोडं काम जरी असल की आपुन कुणाला तरी रोजाने देऊन टाकतो. पण इथं दोघे नवरा बायकोचं सगळं सांभाळतात. यासाठी ते एकाच वेळी जास्त मोरघासाच्या चार्याची निर्मिती करतात.
त्यात सरकी पेंड, वालीस, उस आणि हिरवं गायीसाठी उपलब्ध करतात. गरज पडली तर मकाही खरेदी करतात. ज्यामुळे गायी चांगलं खाद्य खाऊन चांगलं दुध देतात. मग त्यांना बराच नफा मिळतो. कुणाच्या हाताखाली दहा हजारात राबण्यापेक्षा हे खूप उत्तम आहे. असं त्यांचं म्हणनं आहे.
त्यात त्यांच्याकडे जमीन पण खूप कमी आहे. एकूण फक्त दोनच एकर जमीन आहे. त्यात अर्धा एकर मध्ये घर आणि आजूबाजूचा परिसर. गोठा आहे. तर उरलेल्या दीड एकरात चारा लागवड केलेली आहे. जेणेकरून खूप कमी प्रमाणात चारा विकत घ्यावा लागतो.
आज अनेकांना अवघड वाटणारं पशुपालन या गोरे कुटुंबाने सोपं करून दाखवलेलं आहे. योग्य वेळी चारा व्यवस्थापन, लसीकरण आणि पाण्याची सोय चांगली केली तर पशुपालन हा व्यवसाय करण शक्य आहे. ते कुणीही करू शकतं. असं गोरे कुटुंबाचं म्हणणं आहे.
आज पन्नास गायी पालन मधून गोरे कुटूंब वर्षाला पन्नास लाख रुपये कमावतात. म्हणजे बघा आहे की नाही एखाद्या नोकरीवाल्याला भारी. अहो कष्ट कुठं ही करा ते डोकेलिटीने आणि प्रामाणिक असलं पाहिजे अगदी गोरे कुटुंबासारखे..गोरे कुटुंबाला पुढील वाटचाली करीता स्टार मराठीकडून खूप शुभेच्या.