या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली होती आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर काळी जादू, त्यानंतर जे झाले ते….
टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिला तर आपण सर्वजण ओळखतो. दिव्यांका ही आपल्या सौंदर्यासोबतच लाजवाब अभिनयामुळे प्रसिद्धीत झळकते. त्याचसोबत तिच्या अफेयर्स मुळे सुद्धा ती बरीच चर्चेत राहते. तब्बल आठ वर्षे एका अभिनेत्यासोबत दिव्यांका रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यानंतर ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. परंतु दिव्यांका मात्र त्याच्यावर खूप प्रेम करत होती. त्याने आपल्या आयुष्यातून जाऊ नये, म्हणून तिने कित्येक प्रयत्न केले. इतकंच नव्हे तर तिने त्याच्यावर काळी जादू सुद्धा केली होती.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने आपल्या मुलाखतीतून हे स्वतःच मीडियासमोर सांगितले. “बनूं मैं तेरी दुल्हन” या मालिकेत दिव्यांका अभिनेता शरद मल्होत्रा सोबत काम करत होती. त्यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली व हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. हे दोघेही एकमेकांसोबत जवळपास 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र याविषयी त्या दोघांनीही कधीच काही मोकळेपणाने सांगितले नाही.
शरद मल्होत्रा सोबत ब्रेकअप झाल्यावर दिव्यांकाने मुलाखतीत सांगितले की,”आम्ही एकमेकांपासून विभक्त झालो, याचे मला सुद्धा खूप दुःख वाटते. त्याने पुन्हा माझ्या आयुष्यात यावे, म्हणून मी अनेक खटाटोप केले. सर्व प्रयत्न केल्यानंतर मी शेवटी काळी जादूची देखील मदत घेतली. मात्र काहीच उपयोग झाला नाही.”
त्यानंतर काही दिवसांनी दिव्यांका च्या आयुष्यात अभिनेता विवेक दहिया याची एन्ट्री झाली. हे दोघेही बराच कालावधी एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये राहिले. त्यानंतर 2016 मध्ये दिव्यांकाने विवेक दहिया सोबत लग्न करून आपला सुखी संसार थाटला. आता त्यांच्या लग्नाला 5 वर्षे होऊन गेलीत. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने “ये है मोहोब्बते”,”तेरी मेरी लवस्टोरी”,”बनूं मैं तेरी दुल्हन”, “अदालत” यांसारख्या अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे “जोर का झटका”,”कॉमेडी सर्कस”,”नच बलिए 8″,”द व्हॉईस 3″,”खतरों के खिलाडी” या रियालिटी शो मध्ये सुद्धा दिव्यांका त्रिपाठी दिसली होती. दिव्यांकाच्या सौंदर्यावर फिदा होणाऱ्या चाहत्यांची अफाट संख्या आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.