‘सिंघम’ चित्रपटातील शिवाची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
मित्रहो या कलाविश्वात अनेक मंडळी आपल्या साथीदारांसोबत नजरेस येतात, त्यांच्या जोड्या प्रत्येक वेळी लाडक्या बनत असतात. एकाच क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक कलाकार पाहायला मिळतात, यातीलच एका जोडीबद्दल आज आपण खास माहिती घेणार आहोत. मित्रहो तुम्ही सर्वांनी “सिंघम” चित्रपट नक्कीच पाहिला असेल, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार, त्यांच्या भूमिका आणि विशेष म्हणजे यातील गाणी प्रचंड गाजली आहेत. अभिनेता अजय देवगण याने या चित्रपटात मुख्य भूमिका पार पाडली होती.
सोबतच या चित्रपटात एक खास खलनायक देखील भेटीस आला होता, यामध्ये “सिंघम” , “सिंबा”, “शेरसिंग”, “गली गली चोर” यांसारख्या चित्रपटात सहायक खलनायक म्हणून नावारूपाला आलेला अभिनेता अशोक समर्थ अलीकडे भलताच चर्चेत आला आहे. त्याच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात, या भूमिकांना पडद्यावर झळकून त्याला एक खास ओळख मिळवून दिली आहे. हिंदी चित्रपटात तर तो असतोच शिवाय काही मराठी चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. आज आपण अशोक सोबतच त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.
अशोक याची पत्नी देखील एक मराठी अभिनेत्री आहे, मराठी कलाविश्वात तिने सुद्धा आपली एक भक्कम ओळख निर्माण केली असून अनेकांना ती खूप आवडते.तिच्या भूमिका सुद्धा चाहत्याना भुरळ घालतात. अभिनेता अशोक समर्थ हा मूळचा बारामतीचा आहे. तिथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. त्याने आपले पुढचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले आहे. शिक्षण चालू असतानाच अशोकला रंगभूमी आवडायला लागली, उमगायला लागली. अभिनयाची आवड अखेर त्याला पडद्यावर घेऊन आलीच. “माझिया प्रियाला प्रीत कळेना” या छोट्या पडद्यावर गाजलेल्या मालिकेतून त्याने पदार्पण केले. त्यानंतर त्याने “लक्ष्य” मालिकेत काम केले होते.
नंतर अशोकने हिंदी चित्रपट सृष्टीकडे आपला मोर्चा वळवला आणि “इंसान” चित्रपटातून त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. २१ फेब्रुवारी २०२०रोजी अभिनेता अशोक समर्थ आणि अभिनेत्री शीतल पाठक हे लग्नबेडीत अडकले. शीतल ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मिलिंद गवळी यांच्या सोबत “कृपासिंधु” चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली होती. सोबतच “चेहरा”, “मंडळी तुमच्यासाठी कायपण”, “गाव माझं तंटामुक्त”, “बाय गो बाय”, “तात्या विंचू लगे रहो”, “सामर्थ्य” यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
अशोक आणि शीतल हे दोघे २०१३ साली “ट्रॅफिक जाम” चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात हे दोघेही मुख्य भूमिकेत झळकले होते. इथूनच या जोडप्याची ओळख झाली, दोघांनाही नंतर वाटले की आपणही एक चित्रपट दिग्दर्शित करावा असे वाटले. जवळपास सात वर्षांनंतर वर्धमान पुंगलीया निर्मिती “जननी” या आगामी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक समर्थ याने केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशोक आणि शीतल यांना अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.