या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला एकेकाळी रस्त्यावर विकावे लागले चने तर कधी घासावी लागली दुसऱ्यांची भांडी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी खूप अथक परिश्रम व अभ्यास करून या इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. अनेक खचता खाल्ल्या, संघर्ष केला. कधी पोटात भाकर तर कधी उपाशी असे गरिबीत जीवन काढलं. पण अखेर यश मिळवलं. प्रसिद्धी मिळवली. आणि असं असून सुद्धा कधीही पाय हवेत उडवले नाहीत. जमीन सोडली नाही. कलाकार असावं तर असं सदा न कदा जमिनीवर.

आपल्याला वरील माहितीप्रमाणे अनेक कलाकारांची नावे घेता येतील; पण आज आपण एका महिला अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत. जिने खूप यशस्वी स्थान निर्माण केलं आहे. सुप्रिया पठारे हे त्या अभिनेत्री चं नाव. अनेक नाटक, सिनेमे व मालिका यामध्ये काम करताना यांना आपण पाहिलेलं असेल. एवढंच काय तर अनेक वेबसिरीज वर सुद्धा आपण पाहिलं असेल. नावाने नाही तरी चेहऱ्याने घराघरांत या अभिनेत्री ला ओळखत आहेत. सोशल मीडियावर ही तिचे बरेच चाहते आहेत.

See also  बिग बॉस मध्ये मिळालेलं मानधन हे तृप्ती देसाई वापरणार या कामांसाठी ! जाणून थक्क व्हाल!

नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेयर करून व्यक्त होणं या अभिनेत्री चं नेहमीच असतं. नुकत्याच एका ठिकाणी दिलेल्या मुलाखती मध्ये सुप्रिया पठारे यांनी बोलताना म्हंटलं की मला संघर्षाच्या काळात भांडे घासायला लागलं होतं. तर चला जाणून घेऊया ही सविस्तर संघर्ष मय गोष्ट.. चार भावंडात सुप्रिया या थोरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावरच घरची आर्थिक घडी बसवण्याची जबाबदारी आली होती. त्यामुळे कधी रस्त्यावर चने विकावे लागले तर कधी भांडी घासावी लागली.

अर्चना नेवरेकर या सुप्रिया पठारे यांच्या बहिणी आहेत. अर्चना या लहानपणी पासून नाटकात काम करायच्या आणि सोबत जाता जाता अशी सुप्रिया यांना आवड निर्माण झाली जी आता आयुष्यात ली महत्वाची भूमिका होऊन बसली आहे.

See also  मराठी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी सुद्धा आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा तिचे सुंदर फोटो...

एवढंच नाही तर अजूनही बरच काही आहे. सुप्रिया पठारे यांनी खूप संघर्ष केलेला आहे. तो संघर्ष व्यक्त करणं एवढं सोपं नाही. एकंदरीतच गोरगरीब जीवन जगणाऱ्या सुप्रिया यांनी आज कलेच्या सर्जनशील जोरावर इंडस्ट्रीत स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत त्या एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये सध्या दिसत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment