“सापशिडी” या खेळाचा शोध लावलाय महाराष्ट्रातील या थोर संतांनी नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

माय मराठीचा अभिमान, भागवत, वारकरी संप्रदायाचे दैवत, संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली. ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केले. पसायदान लिहिले. भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आपण जाणतोच.

पण… माऊली संत ज्ञानेश्वरांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे. कोणता आहे तो शोध? का आणि कसा लागला हा शोध? हे सगळंच फार रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊया.

आजच्या काळातही उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मुले एकत्र जमले आणि दुपारी मोबाइलवरील खेळ खेळून कंटाळा आला की, जुने बैठे गेम्स जसे सापशिडी, कॅरम, पत्ते, बुद्धिबळ इ. खेळले जातात. यात सगळ्यात प्रसिद्ध खेळ म्हणजे सापशिडी. कुणीही अगदी सहज खेळू शकेल, अशा या मनोरंजक खेळाचा शोध संत ज्ञानेश्वर माऊलींनी लावलाय. काय? विश्वास नाही बसत? पण , हेच सत्य आहे. जाणून घेऊया संत ज्ञानेश्वरांची निर्मिती असलेल्या सापशिडीविषयी…

WhatsApp Image 2020 09 11 at 9.44.12 AM

माऊली आणि निवृत्तिनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या लहानग्या सोपानदेव आणि मुक्ताई यांचेसाठी संत ज्ञानेश्वर आणि वडीलबंधू संत निवृत्तिनाथ यांनी “मोक्षपट” या खेळाचा शोध लावला. हे दोघे बंधू भिक्षा घेऊन परत येईपर्यंत लहान भावंडांनी घरातच राहावे आणि त्यांचे मनही रमावे असा त्यांचा यामागील उद्देश होता.

See also  पूजा हेगडेचा बोल्ड अंदाज चर्चेत, ट्रान्सपरंट कपड्यात झळकली अभिनेत्री.

हा मोक्षपट म्हणजेच पहिली “सापशिडी” असे आता सिद्ध झालेय. डेन्मार्क येथील जेकब स्मिडत मॅडीसन (University Of Copenhagen, Institute of Regional and Cross-Cultural Studies, Denmark) यांच्या सखोल संशोधनाने हे सिद्ध झालेय.

​ भागवत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या विद्वान इतिहास संशोधकांनासुद्धा या विषयी अंदाज होता. पण ठोस दाखले मिळत नव्हते. सर्वसामान्य जनतेला नेहमीप्रमाणेच काही माहितीच नव्हते. शेवटी जेकब यांच्या संशोधनाच्या मदतीने हे रहस्य उलगडले.

WhatsApp Image 2020 09 11 at 9.43.24 AM

‘पूर्व भारतात खेळले जाणारे खेळ’, हा डेन्मार्क येथील जेकॉब यांचा संशोधनासाठीचा निवडलेला विषय. संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, तेराव्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांनी सापशिडीचा शोध लावलेला असावा. त्यासाठी त्यांनी अनेक जुने सापशिडी पट मिळवले. मात्र, योग्य संदर्भ मिळत नव्हता.

See also  तानाजी चित्रपटाने २६ व्या दिवशी मोडला बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचा हा रेकॉर्ड!

माऊलींच्या चरित्रातही याबाबत कुठे उल्लेख नव्हता. शेवटी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे जेकब यांनी विचारणा केली. त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये असा संदर्भ असल्याचे सांगितले आणि तिथे माऊलींच्या या मोक्षपटम खेळाचा पट मिळून त्यावर शिक्कामोर्तब झाले.

​मोक्षपटाचे दोन्ही पट २० बाय २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा वापर करावा लागतो. सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर दान मिळते.

सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षडरिपूंची नावे त्यांना देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे, तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर- हिस्ट्रि टाइमलाईन’ नामक पुस्तकाच्या इ. स. ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय बाब’ या चौकटीत, १३व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाश्याचा उपयोग करून एक खेळ तयार केला.

See also  "चल बुरखा घाल आणि नमाज अदा कर" असं शाहरुख एकदा गौरीला म्हणाला आणि सर्वांना एकच धक्का बसला...

यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या मदतीने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापिही लोकप्रिय आहे, असा उल्लेख सापडतो.

संत ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे देशभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रजांनाही हा खेळ प्रचंड आवडला. हा खेळ ते इंग्लंडमध्ये घेऊन गेले. नेहमीप्रमाणे त्यात थोडे बदल करून ‘स्नेक अँड लॅडर’ या नावाने तो प्रसिद्ध केला. आजच्या काळात आपण “त्यांच्या पद्धतीने” सापशिडी खेळत असलो तरी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हेच या खेळाचे जनक असून, हा अस्सल मराठी, भारतीय खेळ आहे हेच सत्य.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment