मराठी सिरीयलच्या सेटवरील कलाकारांची जेवणाची अशी असते व्यवस्था, पाहून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचकहो, ‘आधी पोटोबा, मग विठोबा’ ही म्हण आपण सर्व जाणतोच. सिरीयलच्या सेटवर १२-१४ तास शूटिंग सुरू असताना, को’रो’ना सं’क्र’म’ण काळात आवश्यक नियम पालन करून आपल्या मराठमोळ्या कलाकारांच्या ‘पोटोबा’ ची काळजी आणि सुव्यवस्था कशी असते त्याचा हा आढावा, स्टार मराठीच्या वाचकांसाठी.

मराठी मालिकांचं शूटिंग सध्या वेगानं सुरू असून, त्यासाठी पडद्यामागे प्रचंड मेहनत घेतली जातेय. तांत्रिक गोष्टी तर आहेतच, शिवाय सेटवर असणाऱ्या प्रत्येकाच्या भोजनकडेही तेवढंच लक्ष दिलं जातंय. क’रो’ना सं’क’टामुळे सेटवरील केटरींग व्यवस्थेचं चित्र नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे. सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण, मास्क या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेत सेटवर जेवण, चहा-नाश्ता याची सोय केल्याचं दिसून येतंय.

‘अग्गंबाई सासूबाई’, ‘लाडाची मी लेक गं’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या सिरीयलच्या सेटवर पॅकबं’द जेवण आणि दोन्ही वेळचा नाश्ता येतो. प्रत्येकाचा पॅक वेगवेगळा असतो. तर काही कलाकार स्वत:चा डबा आणतात.

See also  सुशांतसिंग आ'त्म'ह'त्या प्र'करणामधील मुख्य असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेली या अभिनेत्या सोबत पार्टी करायला...

‘तुझं माझं जमतंय’ आणि ‘डॉ. डॉन’ यासह इतरही काही सिरीयलच्या सेटवर जेवणासाठी आचारी ठेवण्यात आले आहेत. शुभ मंगल ऑनलाइन’ या मालिकेच्या सेटवर प्रसंगी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने स्वत: संध्याकाळचा नाश्ता सेटवर बनवतात. इतरांनाही खाता येईल या दृष्टिनं तो थोडा जास्तच बनवला जातो. अनेक कलाकार जेवणाचा स्वत:चा डबा घेऊन येतात.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचं शूटिंग नाशिकला असतं. बहुतांश कलाकार तिथलेच असल्यामुळे ते घरुन डबे आणतात. इतरांसाठीही घरगुती पद्धतीच्या जेवणाचे डबे येतात. तर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’च्या सेटच्या मागच्या बाजूला मोठं कँटीन आहे. तिथेच जेवण, नाश्ता बनवला जातो. आवश्यक साहित्य, सामानाचं निर्जंतुकीकरण करून तिथे स्वयंपाक केला जातो.

‘माझा होशील ना’ या मालिकेच्या सेटवरही घरगुती पद्धतीचा स्वयंपाक केला जातो. काही कलाकार पूर्वी त्यांचं जेवण घरून आणायचे. आता याचं प्रमाण वाढताना दिसतंय.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील प्रत्येक जोडीला एक अशा खोल्या दिल्या आहेत. ते घरुन डबे आणत असल्यामुळे आपापल्या खोल्यांमध्ये बसून जेवतात.

See also  मिस इंडिया झालेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक केलं होतं विदेशी बिझनेसमनशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

सिंगिंग स्टारच्या जोड्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून जेवतात.  ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेच्या सेटवर बहुतांश लोक घरुन जेवणाचे डबे घरून आणतात.

जेवताना गर्दी होऊ नये या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही काळजी घेतली जातेय. सेटवर कलाकारांच्या ‘पोटोबा’ची काळजी घेणाऱ्यांचे मात्र होतायत हाल…

बदललेले शूटिंग लोकेशन, कमी लोकांत सुरू असलेलं काम, नवे नियम, वाढीव खर्च यामुळे सिरीयलच्या सेटवर भोजन पुरवणाऱ्यांचा व्यवसायही अडचणीत आलाय. लॉ’क’डा’उ’नमध्ये तीन महिने शूटिंग बं’द असल्यामुळे पडद्यामागे काम करणाऱ्यांचीही परिस्थिती बिकट झाली.

अ’न’लॉ’कमध्ये पुन्हा शूटिंग सुरू झालं असलं, तरी सेटवर कमी लोकांमध्ये काम सुरू आहे. सिरीयलच्या सेटवर चहा-नाश्ता, भोजनाची व्यवस्था सोय करणाऱ्या केटरर्सना आर्थिक फटका बसलाय, सध्याच्या काळात सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जेवणासाठी युज अँड थ्रो ताटं, वाट्या, चमचे वापरावे लागतात. त्याचाही वाढीव खर्च होतोय.

See also  'तारक मेहता...' या मालिकेतील या प्रसिद्ध व्यक्तीने राहत्या घरी अ'चानक केली आ'त्म'ह'त्या, कारण...

भोजनाची वेळ दुपारी दीड-दोनची असली, तरी सेटवर सगळे त्याच वेळेत जेवतातच असं नाही. काहींना उशीर होतो. पॅकबंद केलेले अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे अन्न वाया जाण्याचं प्रमाण वाढतं. एका व्यक्तीच्या दोन वेळच्या जेवणाच्या फक्त पॅकिंगसाठीच साधारणपणे ३५-४० रुपये वाढीव खर्च येतो. केवळ पॅकिंगचाच एवढा खर्च असेल तर सर्व मिळून खर्च किती असू शकतो याची कल्पना आपण करूच शकतो. या सर्व संकटातून आपल्या सर्वांनाच तरुन जाण्याची शक्ती मिळो. हीच त्या नटराजाचरणी प्रार्थना!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment